पिंपरी – पिंपरीत शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचा मृत्यू (Gajanan Chinchwade death) झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. मात्र माझ्या नवऱ्याचा मृत्यू खोटा गुन्हा दाखल केल्याने झाला असल्याचा आरोप पत्नी नगरसेविका आश्विनी चिंचवडे (Corporator Ashwini Chinchwade) यांनी केल्याने सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. पत्नी नगरसेविका आश्विनी चिंचवडे यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी(Pimpri Police) शकुंतला बाळू चिंचवडे, दिनेश बाळू चिंचवडे, राजेश बाळू चिंचवडे, महेश उर्फ सुनील बाळू चिंचवडे, ओमकार महेश चिंचवडे, संकेत दिनेश चिंचवडे, वंदना दिनेश चिंचवडे, पुनम महेश चिंचवडे आणि राजेश चिंचवडे यांच्या पत्नी (सर्व रा. चिंचवडेनगर चिंचवड गाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पत्नी नगरसेविका आश्विनी चिंचवडे यांनी पोलिसात वरील आरोपींच्यामुळे आपल्या पतीचा मृत्यू झाल्याची तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांचे पती गजानन चिंचवडे यांच्याविरोधात 25 जानेवारी 2022 रोजी चिंचवड पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला.तसेच, प्रसिद्धी माध्यमांमध्ये खोटी माहिती देऊन बदनामी करीत त्यांना मानसिक त्रास दिला. त्यामुळे गजानन चिंचवडे यांच्या मृत्यूस आरोपी कारणीभूत ठरल्याचे फिर्यादीत नमूद केलं आहे. त्याचा मृत्यू झाला आहे की आत्महत्या केली आहे. याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. शवविच्छेदन अहवालानंतर चित्र स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. डॉक्टरांनी देखील व्हिसेरा राखून ठेवल्याने या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. निगडी पोलिस करीत आहेत.
शांत स्वभावाच्या लतादिदी जेव्हा मोहम्मद रफींवर भडकल्या, म्हणाल्या, “मी नाही गाणार तुमच्यासोबत”
कट्टर राजकीय विरोधक एकत्र, अजित पवार-हर्षवर्धन पाटील यांच्यात काय चर्चा?