पुणे : पुण्यातील दत्तनगर, भारतनगर, महादेव नगर आदी भागांत पाणी येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आक्रमक झाली आहे. महापालिकेच्या विरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली असून आंदोलन (Agitation) करण्यात आले आहे. प्रशासक विक्रम कुमारांच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. लवकरात लवकर पाणीपुरवठा (Water supply) सुरळीत केला नाही तर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. महादेवनगरमधील पाण्याच्या टाकीजवळ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला कार्यकर्त्या हंडा घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. एकीकडे प्रगती होत असताना महाराष्ट्र मागे चालला आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठीसुद्धा आंदोलन करावे लागत आहे, असे आंदोलक यावेळी म्हणाले. महापालिका प्रशासकाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात यावेळी घोषणा देण्यात आल्या.
Pune : पुण्यातील दत्तनगर, भारतनगर, महादेव नगर या भागांत पाणी येत नसल्यानं राष्ट्रवादी आक्रमक झाली. महादेवनगरमधल्या पाण्याच्या टाकीजवळ आज आंदोलन करण्यात आलं. @NCPspeaks @BJP4Maharashtra #Pune #NCP #water #Video
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmGZMLmk pic.twitter.com/bhDarQMRau— TV9 Marathi (@TV9Marathi) March 24, 2022
दत्तनगर, भारतनगर, महादेव नगर यासह आसपासच्या परिसरात पाण्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. येथील नागरिकांना विशेषत: महिलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. पाणीपुरवठा सुरळीत नाही. आधीच उन्हाळा, त्यात आता पाण्याची ही समस्या यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. देश प्रगतीकडे चालला असताना राज्यात पाण्यासारख्या प्रश्नावरून आंदोलन करावे लागत आहे, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या आंदोलकांनी घेतली आहे. आता लवकरात लवकर समस्या न सोडवल्यास अधिक आक्रमक आंदोलन करणार असल्याचे आंदोलक म्हणाले आहेत.