“या सरकारच्या आर्थिक धोरणामुळे सामान्य माणसाच्या डोक्यावर महागाईच ओझं”; राष्ट्रवादीचा केंद्र-राज्य सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Jan 04, 2023 | 8:14 PM

केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजप सत्तेत आहे. राज्यातील आणि देशातील समस्या न मिठवता या दोन्ही सरकारकडून नको ते समस्या निर्माण केल्या जात आहेत.

या सरकारच्या आर्थिक धोरणामुळे सामान्य माणसाच्या डोक्यावर महागाईच ओझं; राष्ट्रवादीचा केंद्र-राज्य सरकारवर हल्लाबोल
Follow us on

पुणेः मागील गेल्या काही दिवसांपासून राज्याबरोबर देशात महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे देशातील जनसामान्य नागरिक महागाईमुळे त्रस्त झाला आहे. महागाई, बेरोजगारी, औद्योगिक क्षेत्राला देशातीला आणि राज्यातील सरकारामुळे मोठा फटका बसला आहे त्यामुळे अशा सरकारला आम्हाला पुन्हा संधी द्यायची नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारला लगावला आहे. राज्य आणि केंद्रातील सरकारच्या भूमिकेमुळेच महाराष्ट्रातील जनतेचे हाल होत आहेत अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

सामान्य माणसाला महागाईच्या गर्तेत ढकलून देण्याचं काम राज्यकर्ते करत आहेत. या सरकारच्या आर्थिक धोरणामुळे सामान्य माणसाच्या डोक्यावर महागाईच ओझं आहे.

महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक संकटामुळे येथील नागरिक मेटाकुटीला आला आहे. जनसामान्यांना डोकेदुखी ठरणाऱ्या या अशा सरकारला आम्हाला पुन्हा संधी द्यायचीच नाही असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

राज्याबरोबरच देशावर बेरोजगारीच मोठे संकट आहे. लोकांना काम करण्याची संधी दिली जात नाही त्यामुळे येथील प्रत्येक नागरिक हा आर्थिक संकटात सापडल आहे.

देशात ज्या प्रमाणे महागाईचे संकट आहे, त्याच प्रमाणे बेरोजगारीचेही मोठे संकट आहे. बेरोजगारीमुळे विवाह ठरणे मुश्किल झाले आहे. नोकरी नाही म्हणून लग्नासाठी मुलांसाठी मुली मिळत नाही ही आता राज्यातील युवकांसमोर समस्या निर्माण झाली आहे. या बेरोजगारीचा परिमाण मुलांची लग्न थांबण्यावर झाला असल्याची चिंताही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजप सत्तेत आहे. राज्यातील आणि देशातील समस्या न मिठवता या दोन्ही सरकारकडून नको ते समस्या निर्माण केल्या जात आहेत.

लोकं महागाईमुळे मेटाकुटीला आलेली असतानाच भाजपकडून मात्र जाती जातीमध्ये तेड निर्माण करून धर्मा धर्मामध्ये वाद निर्माण केले जात आहेत. धर्म, जात यावर वाद निर्माण केल्यामुळे लोकांचं लक्ष विचलित केले जात असल्याची टीकाही त्यांनी भाजपवर केली आहे.