पहिल्यांदाच असं घडलं… गावकऱ्यांनी केली शरद पवार यांचीच पवारांकडे तक्रार; पवारांनी सांगितलेला तो किस्सा काय?

| Updated on: Jan 01, 2023 | 1:44 PM

पत्रकारांपासून जरा सावध रहा. तुम्ही ऊसाबद्दल सांगता आणि सरकार त्यावर कर लावतं. देशात महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल व्हावं एवढंच वाटतं, असंही ते म्हणाले.

पहिल्यांदाच असं घडलं... गावकऱ्यांनी केली शरद पवार यांचीच पवारांकडे तक्रार; पवारांनी सांगितलेला तो किस्सा काय?
पहिल्यांदाच असं घडलं... गावकऱ्यांनी केली शरद पवार यांचीच पवारांकडे तक्रार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

इंदापूर: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे संसदीय राजकारणात आल्यापासून कधीच पराभूत झाले नाहीत. त्यांच्या मतदारसंघातीलच नव्हे तर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची ते नेहमी ओळख ठेवत असतात. भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीची नावे त्यांना तोंडपाठ असतात. पवारांनी आपल्या मतदारसंघात प्रचंड कामे केली. त्यामुळे त्यांना निवडणुकीच्या काळात कधीच प्रचारासाठी जावं लागत नसल्याचंही सांगितलं जातं. पण तुम्ही खासदार असताना आमच्या मतदारसंघात फिरकलाच नाहीत, अशी तक्रार जर कोणी शरद पवार यांच्याकडे केली तर? विश्वास नाही ना बसत? पण हे खरं आहे. शरद पवार यांनीच याबाबतचा एक किस्सा सांगितला. अन् गावकऱ्यांना त्यांच्या तक्रारीवर उत्तर दिल्यानंतर त्या गावकऱ्यांची विकेट कशी उडाली हे सुद्धा पवारांनी सांगितलं.

शरद पवार आज इंदापूरच्या दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याने उच्च दर्जाची द्राक्ष निर्माण केली आहेत. त्याची माहिती घेण्यासाठी ते इंदापूरला आले होते. त्यानंतर त्यांनी काही गावकऱ्यांशी संवाद साधला.

हे सुद्धा वाचा

महिंद्रा कंपनी आणि माझेही ऋणानुबंध आहेत. सुप्रियाचे सासरे आणि केशव महिंद्रा यांनी एकत्रित व्यवसाय केला. त्यांच्या घरात माझी मुलगी दिली. ती आता तुमची खासदार आहे. मी विचारतो खासदार येतात का?

लोक सांगतात नेहमी येतात. पूर्वीचे खासदार येतच नव्हते. तेव्हा मी सांगतो. आधी मीच खासदार होतो, शरद पवार यांनी असं विधान करताच एकच खसखस पिकली.

यापूर्वी मी बोरी गावात येवून गेलो. राज्यातली काही गावे अशी आहेत ज्यांच्याबद्दल आस्था कायम आहे. त्यापैकी बोरी गाव हे एक आहे. संकटावर मात करुन आदर्श गाव निर्माण करणाऱ्या गावांबद्दल माझ्या मनात आस्था आहे.

बोरीच्या शेतकऱ्यांनी द्राक्षबागा लावल्या. अनेक संकट आली. मात्र त्यावर मात करुन तुम्ही पुन्हा उभं राहिलात. उच्च दर्जाची द्राक्ष निर्माण करता हे बघून चांगलं वाटतं, असं पवार म्हणाले.

15 वर्षांपूर्वी मी फळबाग योजना आणली होतीय मुख्यमंत्री असताना योजना तयार केली होती. त्यात सुधारणा करुन फळबाग योजना देशासाठी कार्यान्वित केली.

आज जगात सर्वाधिक फळ उत्पादन घेणारा भारत देश आहे. मी अनेक देशात जातो. तिथल्या बाजारात जातो. तिथे अनेक फळांवर भारताचा शिक्का दिसतो, असंही त्यांनी सांगितलं.

आता जीवनमान बदललं आहे. सुधारणा झाली आहे. पूर्वी कुडाची घरे होती. आता बंगले, गाड्या दिसतात. छत्रपती कारखान्याच्या सभेत मला साखर संघाचा प्रतिनिधी म्हणून पाठवलं. त्या काळात गावाकडे वाहने बघायला मिळायची नाहीत.

छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात काही कुटुंबाकडे वाहने दिसायची. आता लग्न असेल तर वाहने कुठे पार्क करायची याचा विचार होतो. शेतकऱ्यांचे कष्ट आणि शासनाचे धोरण यामुळे हे शक्य झालं, असं त्यांनी स्पष्ट केलं.

आज द्राक्ष अनेक देशात निर्यात होतात. हे त्या काळी घेतलेल्या निर्णयांचे फलित आहे. चांगला लोकप्रतिनिधी. दत्ता भरणेंना संधी दिली. त्यांनी विकासाला गती दिली. त्यांच्याबद्दल तक्रार येते. इंदापूरला निधी येतो. आम्हाला नाही. जरा इतरांकडेही लक्ष द्यास, असं म्हणत त्यांनी भरणे यांना कानपिचक्या दिल्या.

देशात धान्य आयात करावं लागायचं. ते दिवस आता संपले आहेत. पण आता आपण निर्यात करतो. शेतकऱ्याचे कष्ट आणि आम्ही त्या काळात घेतलेले निर्णय यामुळे आज चांगले दिवस आले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

कळसच्या खर्चेंबद्दल ऐकलं. ऊस उत्पादनात प्रगती झालीय. हा गडी बारामतीत शिकलाय. कळसमध्ये काय केलंय हे बघायला आलोय. हा बदल पाहून आणखी पुढे कसं जाता येईल हे पहावं लागेल.

पत्रकारांपासून जरा सावध रहा. तुम्ही ऊसाबद्दल सांगता आणि सरकार त्यावर कर लावतं. देशात महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल व्हावं एवढंच वाटतं, असंही ते म्हणाले.