पुणे : भाजपाचे माजी आमदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांच्याविरोधात हडपसर (Hadapsar) पोलिसांत (Police) तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अनिल घुले यांनी त्यांच्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कामगारांकडून जो हल्ला करण्यात आला होता, याच घटनेचा आधार घेत भाजपाचे माजी आमदार अनिल बोंडे यांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या धमकी व त्यांना कायमस्वरूपी राजकारणापासून सन्यास घेण्याचा सल्ला दिला होता तसेच जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे अनिल बोंडे यांच्याविरोधात त्यांनी तक्रार दिली आहे. अनिल बोंडे यांच्या वक्तव्याचा निषेध करत अजित दत्तात्रय घुले यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल केली आहे.
अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि 109 एसटी कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवला जात आहे. शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला सहानुभूतीसाठी राष्ट्रवादीने केला असावा, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. या हल्ल्याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी त्यांनाी केली होती. तसेच संजय राऊत यांनी सदावर्ते यांचा भाजपाशी संबंध आहे हे सिद्ध करावे, असे आव्हानही बोंडे यांनी दिले होते.