पुणे : एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST Employees strike) हा प्रश्न राज्याचा होता. तुम्हाला मोर्चाच (Morcha) आणि हल्लाच करायचा होता तर मातोश्रीवर (Matoshree) करायचा. मग तुम्हाला कळले असते हल्ल्याची किंमत काय मोजायला लागले ती… अशा शब्दांत हल्लेखोर आणि त्यामागे असणाऱ्या शक्तीचा राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी समाचार घेतला. राज्याचे परिवहन खाते अनिल परब यांच्याकडे आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचे मग तुम्हाला जे काय करायचे ते ज्याच्याकडे खाते आहे, तिकडे करायचे. ज्या विषयाशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा संबध नाही, जो विषय पवारसाहेब हाताळत नाहीत, त्यासाठी जाणीवपूर्वक हल्ला घडवून आणण्यामागे काही लोकांचा विशिष्ट हेतू आहे, अशी टीका मोहिते पाटील यांनी केली.
महाविकास आघाडी सरकार चालविण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला अस्थिर करण्यासाठी हल्ला घडवून आणल्याचा आरोप दिलीप मोहिते पाटलांनी केला आहे. राजगुरूनगर येथून पुणे-नाशिक महामार्गावरून राजगुरूनगर पोलीस स्टेशनवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिलांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील बोलत होते.
#Pune : शरद पवार यांच्या निवासस्थानी जाणीवपूर्वक हल्ला घडवून आणण्यामागे काही लोकांचा विशिष्ट हेतू आहे, अशी टीका मोहिते पाटील यांनी केली आहे.@NCPspeaks #SharadPawar #STStrike #NCP
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmH04UAs pic.twitter.com/yLQCpoGQh4— TV9 Marathi (@TV9Marathi) April 9, 2022
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी (MSRTC) तासभर राडा केला. शरद पवार आमच्या एसटीच्या विलीनीकरणाच्या आड आले, असा आरोप करत काल एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन केले होते. त्यानंतर आज राष्ट्रवादीतर्फे विविध ठिकाणी निषेध मोर्चा काढण्यात आला.