“तुमच्यासाठी फडतूस हा शब्द योग्यच”; राष्ट्रवादीनं पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना डिवचलं

| Updated on: Apr 05, 2023 | 9:03 PM

सत्ताधाऱ्यांच्या या वृत्तीमुळेच उद्धव ठाकरे यांनी फडतूस हा शब्द तुमच्यासाठी वापरला असल्याची टीकाही करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेमुळे आता राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

तुमच्यासाठी फडतूस हा शब्द योग्यच; राष्ट्रवादीनं पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना डिवचलं
Follow us on

पुणे : मागील चार दिवसांपासून ठाकरे गट विरुद्ध भाजप, शिवसेना असा सामना रंगला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना आपल्याला देवेंद्र फडतूस यांच्यासारखा फडतूस गृहमंत्री मिळाला असल्याची टीका केली होती. त्यावरूनच राज्यातील राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेचे समर्थन करत उद्धव ठाकरे यांची टीका योग्यच असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ज्या प्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे.

त्याच प्रमाणे त्यांच्या मित्र पक्षाकडून त्यांच्या टीकेचे समर्थनही केले जात आहे. त्यामुळेच आता राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या टीकेचे समर्थन करत केलेली टीका योग्य असल्याचे म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांचे समर्थन करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी सत्तेत बसून आम्हाला धमक्या देऊ नका अशा शब्दात त्यांनी भाजप आणि शिवसेनेच्या सरकारला थेट इशाराच दिला आहे. त्यामुळे आता या वादात राष्ट्रवादीने उडी घेतल्याने हा वाद आणखी चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.

रुपाली ठोंबरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हणाल्या की, सत्तेवर बसून आम्हाला धमक्या देऊ नका. कारण उद्धव ठाकरे यांनी जी टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी जो फडतूस शब्द वापरला आहे. तो फडतूस हा शब्द योग्यच असल्याची टीकाही रुपाली ठोंबरे यांनी केली आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही जोरदार निशाणा साधला आहे. सत्तेत असल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारकडून विरोधकांना धमक्या देण्याचे काम सुरु आहे.

सत्ताधाऱ्यांच्या या वृत्तीमुळेच उद्धव ठाकरे यांनी फडतूस हा शब्द तुमच्यासाठी वापरला असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

त्याच बरोबरच रोशनी शिंदे यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याचे काम हे सरकार करत असल्याने हेच या सरकारचे अपयश असल्याचेदेखील ठोंबरे यांनी म्हटले आहे.