“जाहिरातीत एवढा गोंधळ तर सरकार चालवताना केवढा”; सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर राष्ट्रवादीची टीका…

| Updated on: Jun 14, 2023 | 10:18 PM

रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली असली तरी दुसऱ्या बाजूला मात्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे समर्थन केले आहे. त्यांनी एका महिलेची बाजू घेतली ती योग्य असल्याचे सांगत रोहित पवारांनी श्रीकांत शिंदे यांचे समर्थन केले आहे.

जाहिरातीत एवढा गोंधळ तर सरकार चालवताना केवढा; सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर राष्ट्रवादीची टीका...
Follow us on

पुणे : शिंदे-फडणवीस सरकारच्या दोन दिवसांच्या जाहिरातीमुळे आता विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यावरूनच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडूनही सरकारवर टीका करण्यात आली आहे. सरकारच्या या जाहिरातीमुळे आता शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरु झाल्याचीही चर्चा केली जात आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यावरही विरोधकांकडून टीका केली जात असून आमदार रोहित पवार यांनी सरकारमध्ये सगळा सावळा गोंधळ चालू असल्याची खोचक टीका केली आहे. जाहिरातीत एवढा गोंधळ तर सरकार चालवताना केवढा गोंधळ आहे असं म्हणत या सरकारकडून जनतेच्या कामापेक्षा सरकारने आपल्याच जाहिरातीवर वारेपमाफ खर्च केल्याचा गंभीर आरोपही रोहित पवार यांनी केला आहे.

त्यामुळे भविष्यातही असाच गोंधळ वाढण्याची शक्यता रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे तर दुसरीकडे फडणवीस आणि श्रीकांत शिंदे यांचे समर्थन केले आहे.

पंतप्रधानांची परवानगी घेतली का..?

आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना म्हणाले की, जाहिरातीसाठी पहिल्या दिवशी 10 कोटी तर दुसऱ्या दिवसाच्या जाहिरातीसाठी 10 कोटी खर्च करण्यात आला आहे. ज्या प्रकारे या सरकारने जाहिरातीत पंतप्रधान मोदींचा फोटो छापला आहे, मात्र पंतप्रधानांचा फोटो छापण्यासाठी त्याला परवानगी घ्यावी लागते ती आधी या सरकारने घेतली होती का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

रोहित पवारांचे श्रीकांत शिंदेंना समर्थन

रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली असली तरी दुसऱ्या बाजूला मात्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे समर्थन केले आहे. त्यांनी एका महिलेची बाजू घेतली ती योग्य असल्याचे सांगत रोहित पवारांनी श्रीकांत शिंदे यांचे समर्थन केले आहे.

फडणवीस संस्कृतीला धरुन बोलतात

देवेंद्र फडणवीस हे आम्हाला अपेक्षित संस्कृतीला धरून बोलत असतात, मात्र त्यांच्या पक्षातील छोटे नेते खालच्या पातळीवर जाऊन बोलत असतात, त्यांना फडणवीसांनी सांगितले पाहिजे की, त्यामुळे एकाच वेळी रोहित पवार यांनी केले श्रीकांत शिंदे यांचेही आणि देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले आहे.