पुणे: राष्ट्रवादी कांग्रेसचे (NCP) शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी पुणे एअरपोर्ट अथॉरिटीला ट्विटरवरुन काही प्रश्न विचारले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्जिकल स्ट्राईक केलेला लाल महालसुद्धा पुण्यात आहे, अशी आठवण त्यांनी करुन दिली आहे. पुणे विमानतळावर पेशवाईची चित्रे दिसतात पण मग शिवरायांचे कर्तृत्व का दिसत नाही असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.
पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा लालमहालसुद्धा आहे, सिंहगडही आहे आणि याच जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ वढू तुळापूर देखील आहे याचा पुणे एअरपोर्ट अथॉरिटीला विसर पडला की काय?
पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा लालमहालसुद्धा आहे, सिंहगडही आहे आणि याच जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी.१/२ pic.twitter.com/eLOrOQ2497
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 3, 2021
पुणे विमानतळावर काढण्यात आलेल्या पेटिंग्जबद्दलची सोशल मिडियावरची खासदार अमोल कोल्हें यांची पोस्ट चर्चेत आहे. पुणे विमानतळावर पेशवाईची चित्रे दिसतात पण मग शिवरायांचे कर्तृत्व का दिसत नाही असा सवाल त्यांनी ट्विटरवरुन पुणे एअरपोर्ट अथॉरिटी विचारला आहे. विमानतळावरील पेंटिंग्जसोबतचा सेल्फी आणि एक फोटोही कोल्हेंनी ट्विटरवर शेअर केला आहे.
ज्या पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो किल्ला, पुण्यात त्यांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटली तो लाल महाल, तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष असणारा सिंहगड आणि छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ वढू तुळापूर देखील आहे, अशी आठवण अमोल कोल्हे यांनी करुन दिली आहे.
शिवाजी महाराजांचं कर्तृत्व पुणे विमानतळावर का दिसत नाही. शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा इतिहास सांगणारं विमानतळावर काहीच नाही, याबद्दल अमोल कोल्हे यांनी नाराजी व्यक्त केलीय. अमोल कोल्हे यांनी या ट्विटमध्ये केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, पुण्याचे खासदार गिरीश बापट, पुणे एअरपोर्ट अथॉरिटीला टॅग केलं आहे.
इतर बातम्या:
omicron alert | पिंपरीत नायजेरियाहून आलेल्या आणखी एकाला कोरोनाची लागण
NCP MP Amol Kolhe tweet and asked question over Chhatrapati Shivaji Maharaj history related paintings not available on Pune Airport