पुणे : पुण्यात उद्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही व्यासपीठावर असतील. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच उलथापालथी झाल्या आहेत. त्यामुळे उद्या हे दोन्ही नेते मंचावरुन काय बोलणार? याची राजकीय जाणकारांपासून सगळ्यांनाच उत्सुक्ता आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. पवार यांचे पुतणे अजित पवार भाजपा-शिवसेना महायुती सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. याला शरद पवार यांचा विरोध आहे.
उद्या पुण्यात काय घडणार?
विचारधार सोडू नये, असं शरद पवार यांचं मत आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे निम्म्यापेक्षा जास्त आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. दरम्यान उद्या पुण्यात काय घडणार? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
मोदींचा उद्याचा पुणे दौरा कसा असेल त्या बद्दल जाणून घ्या
– देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार.
– पुण्यातील मेट्रोसह विविध प्रकल्पांच मोदी करणार उद्घाटन
– कसा असेल पंतप्रधान मोदींचा दौरा
– पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील पुणे दौऱ्यावर येत आहेत.
– 10.30 वाजता पंतप्रधान मोदींच पुणे विमानतळावर आगमन होईल
– सकाळी 11 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत.
– 11.45 वाजता पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
– त्यानंतर, दुपारी 12:45 वाजता पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत
– शिवाजीनगरच्या ग्राऊंडवर मोदींची सभा होईल
– तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार
– पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून पुणे मेट्रो टप्पा 1 च्या कार्य पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांच्या सेवेचे लोकार्पण करणार आहेत.
1 ऑगस्ट रोजी पुणे शहरातील वाहतुकीत बदल
– पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल करण्यात येणार
– पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांची माहिती
– 1 ऑगस्टला सकाळी 6 वा. ते दुपारी 3 दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात आवश्यकतेप्रमाणे बदल करण्यात येतील.
– पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, अलका चौक, टिळक रोड, जेधे चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, संगमवाडी रोड, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रोड आदी ठिकाणांवरील वाहतूकीत बदल करण्यात येतील.
– वाहनचालकांनी त्यांची गैरसोय होवू नये याकरीता या मार्गांचा वापर टाळून अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.