Pune Coronavirus: पुण्यातील नागरिकांमध्ये कोरोनाची प्रचंड दहशत; कंट्रोल रुमला दिवसाकाठी 9 ते 10 हजार फोन

| Updated on: Apr 21, 2021 | 8:19 AM

गेल्या काही दिवसांमध्ये या फोन कॉल्सची संख्या कमालीची वाढली आहे. | Pune Coronavirus

Pune Coronavirus: पुण्यातील नागरिकांमध्ये कोरोनाची प्रचंड दहशत; कंट्रोल रुमला दिवसाकाठी 9 ते 10 हजार फोन
पुण्यातील नागरिकांमध्ये कोरोनाची प्रचंड दहशत
Follow us on

पुणे: कोरोना रुग्णांच्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे पुण्यातील आरोग्ययंत्रणा जवळपास कोलमडली आहे. जिल्ह्यात ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि बेडसचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. अशातच आगामी पुण्यात (Pune Coronavirus) दिवसांमधील परिस्थिती यापेक्षाही गंभीर असू शकते, असे संकेत प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. या सगळ्या नकारात्मक वातावरणाचा परिणाम आता पुण्यातील नागरिकांच्या मानसिकतेवर होऊ लागला आहे. (Coronavirus situation in Pune)

पुण्यातील कंट्रोल रुममध्ये दररोज घाबरलेल्या नागरिकांचे फोन येत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये या फोन कॉल्सची संख्या कमालीची वाढली आहे. आम्ही दिवसाला 9 ते 10 हजार लोकांशी बोलत आहोत. यापैकी बहुतांश फोन कॉल्स हे कोरोनासंबंधीच्या समस्यांशी निगडीत असतात. लोकांमध्ये आता कोरोनाची प्रचंड दहशत पसरली आहे, अशी माहिती पुण्यातील कंट्रोल रूमच्या व्यवस्थापकांकडून देण्यात आली.

पुण्यातील कोरोना स्थिती

पुणे शहरात मंगळवारी दिवसभरात 5 हजार 138 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 6 हजार 802 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात दिवसभरात 55 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सध्या 52 हजार 977 रुग्णांवर उपचार सुरु असून त्यातील 1 हजार 277 जणांची प्रकृती गंभीर आहे.


कालच्या आकडेवारीनुसार पुण्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 76 हजार 962 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 3 लाख 17 हजार 767 जण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत 6 हजार 218 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या स्थिर

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी आता काही दिलासादायक गोष्टी समोर येताना दिसत आहेत. गेल्या आठवडाभरापासून पुण्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या स्थिर असल्याचे निदर्शनास आले आहे.

अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा सध्या लाखाच्या आसपास आहे. गेल्या आठवडाभरात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत केवळ 4,276 नव्या रुग्णांची भर पडली आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,061 ने कमी नोंदवण्यात आली.

संबंधित बातम्या:

पुणे, पिंपरी-चिंचवडसह नगरमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा, रात्रभर पुरेल एवढाच साठा शिल्लक

महिन्याला 70 हजार ते 1.50 लाख रुपये पगार देऊनही पुण्यात डॉक्टरांचा तुटवडा

पुण्यातील कोव्हिड सेंटरमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण; शिवसेनेचा नेता संतापला

Pune Lockdown : ‘मरणं झालं स्वस्त, स्मशानभूमीत लागल्या रांगा, पालकमंत्री साहेब वाचवा’, पुणेकरांची अजितदादांना साद

(Coronavirus situation in Pune)