सातारा : पेट्रोलने शंभरी गाठली आहे. इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. घरगुती गॅसच्या दरातही पुन्हा एकदा वाढ झाली आहे. या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागतेय. तर पेट्रोलची चोरुन विक्री करणाऱ्यांचं मात्र चांदी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, पेट्रोल विक्रीतून मोठ्या प्रमाणात पैसा कमावला जाऊ लागला आहे. त्यासाठी आता पेट्रोलची चोरी होण्याच्या प्रकारांमध्येही वाढ होत आहे. साताऱ्यात पेट्रोलची चोरी करण्यासाठी चोरट्यांनी थेट पेट्रोल वाहून नेणारी पाईपलाईनच फोडली आहे. (Thieves broke into a petrol pipeline near Satara)
मुंबई-पुणे-सोलापूर अशी जाणारी पाईपलाईन चोरट्यांनी फोडली आहे. साताऱ्यातील सासवड गावाजवळ या पाईपलाईनला मोठं भगदाड पाडण्यात आलं आहे. त्यामुळे हजारो लीटर पेट्रोल वाया गेलं. इतकंच नाही तर पेट्रोल जमिनीत मुरल्यामुळे आजूबाजूच्या विहिरीतील पाण्याचा रंगही बदलला आहे. त्याचबरोबर शेतातील पिकांचंही पेट्रोलमुळे मोठं नुकसान झालं आहे. ही पाईपलाईन फोडल्यानंतर वेळीच अलार्म वाजल्यामुळे मोठी दुर्घटना टाळण्यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांना यश आलं आहे.
अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमतींनी शंभरी गाठली आहे. किंमती वाढल्यामुळे पेट्रोल चोरी जोमात आहे. नवी मुंबईतील खारघरमध्ये सोसायटीच्या गाड्यांमधून पेट्रोल चोरीच्या घटनांमध्ये आता वाढ झाली आहे. पेट्रोल चोरी करतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलच्या किमतीत वाढ होत असल्यामुळे चोरटे आता पेट्रोल चोरीकडे वळले आहेत. खारघर सेक्टर 34 मधील एका सोसायटीत चोरट्यांनी जवळपास पाच मोटारसायकल मधून पेट्रोल चोरी करुन पोबारा केल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेराद्वारे उजेडात आला आहे.
तसेच, सोसायटीच्या व्हरांड्यात असलेल्या नवीन चप्पल देखील लंपास केल्याचे उघड झाले आहे. काही मोटार कारमधून पेट्रोल चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात चोरट्यांना यश आले नाही. ही चोरी पहाटे पाचच्या सुमारास केली असल्याचे समजले.
राज्यातील पेट्रोलचे दर
मुंबई – 97.47 प्रतिलिटर
ठाणे – 97.45 प्रतिलिटर
पुणे – 97.35 प्रतिलिटर
नागपूर – 98.08 प्रतिलिटर
सांगली – 97. 73 प्रतिलिटर
सातारा – 97.94 प्रतिलिटर
कोल्हापूर – 97.78 प्रतिलिटर
परभणी – 99.68 प्रतिलिटर
राज्यातील डिझलचे दर
मुंबई – 88.60 प्रतिलिटर
ठाणे – 88.55 प्रतिलिटर
पुणे – 87.03प्रतिलिटर
नागपूर – 89.15 प्रतिलिटर
सांगली – 87.42 प्रतिलिटर
सातारा – 87.63 प्रतिलिटर
कोल्हापूर – 87.48 प्रतिलिटर
परभणी – 89.28 प्रतिलिटर
संबंधित बातम्या :
नियम बदलले! LPG सिलिंडरसंदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय
Thieves broke into a petrol pipeline near Satara