पुणे : दुभाजकाला दुचाकी आदळून झालेल्या अपघातात तरुणाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरेगाव पार्क (Koregaon Park) येथील नॉर्थ मेन रोडवरील मेडिकल स्टोअरजवळ मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास त्यांच्या वाहनाने एका दुभाजकाला धडक दिली. त्यात 26 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू (Pillion rider dies) झाला, तर दुचाकीस्वाराचा मित्र जखमी झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील मेहुल अग्रवाल असे मृताचे नाव आहे. तो सध्या बालेवाडीत राहत होता. त्याचा जखमी मित्र कोथरूड येथील हर्ष देशमुख (26) याला खासगी रुग्णालयातून उपचारानंतर घरी सोडण्यात आले. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक दत्तात्रय लिगाडे म्हणाले, की देशमुख आणि अग्रवाल कोरेगाव पार्कमध्ये मित्राला भेटून घरी जात होते. देशमुख यांचे वाहन घसरून दुभाजकावर (Divider) आदळले.
अपघातानंतर अग्रवाल याचा उजवा हात फ्रॅक्चर झाला आणि त्यांच्या छातीलाही दुखापत झाली. दुखापत जास्त असल्याने रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, 27 जून रोजी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ससून रुग्णालयाने त्याच्या आगाऊ पोस्टमॉर्टम अहवालात त्याच्या मृत्यूचे कारण म्हणून अनेक जखमा असल्याचे प्रमाणित केले आहे. त्याचा भाऊ प्रतीक अग्रवाल याने भुसावळ येथून सांगितले, की मेहुल पाच दिवसांपूर्वी नोकरीच्या शोधात पुण्याला गेला होता.
या अपघातामुळे महापालिकेने बांधलेल्या दुभाजकांच्या निकृष्ट दर्जा आणि देखभालीवरून वाद निर्माण झाला आहे. ऑल कोरेगाव पार्क रेसिडेंट्स असोसिएशनचे अध्यक्ष कैलाश पिंगळे यांनी सांगितले, की दुभाजक रात्री दिसत नाही. कारण त्याचावरील रंग फिका पडला आहे. त्यात रिफ्लेक्टरही नाहीत.
वरिष्ठ निरीक्षक विनायक वेताळ म्हणाले, की दोन फूट उंच रस्ता दुभाजकाच्या स्ट्रक्चरल डिझाइनमध्ये कोणताही दोष नाही. त्याची तपासणी केली असता त्यात रिफ्लेक्टर नसल्याचे दिसून आले. ढोले पाटील वॉर्ड ऑफिसमधील महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की डिव्हायडरची पाहणी करण्यासाठी अभियंत्यांची नियुक्त केली जाईल. तसेच अपघात टाळण्यासाठी आम्ही रिफ्लेक्टर बसवू.