कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मावळचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल केला जात आहे. यावेळी रोहित पवारांनी स्थानिकांशी संवाद साधला. तेव्हा देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणीस यांनी कुटुंब फोडलं. पार्टी फोडली आणि सत्तेत आले. त्यांना कितीही अहंकार असला तरी त्याला उत्तर देण्याचं काम आपल्याला करायचं आहे, असं रोहित पवार म्हणालेत.
मावळमध्ये परिवर्तन करून दाखविण्यासाठी सामान्य माणसाला स्वाभिमानी भूमीचा खासदार करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. ही लढाई एक विचाराची लढाई आहे. ही लढाई ज्यांनी- ज्यांनी गद्दारी केली त्यांना धडा शिकवायची लढाई आहे. बलाढ्य शक्तीच्या विरोधात ही लढाई आहे, असं रोहित पवार म्हणाले.
आपला आवाज दाबण्याचा पर्यटन होत असेल तर आपण सर्वांनी एकजूट केली पाहिजे. आपल्या विरोधी उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आले होते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आले होते. मागे एक पोटनिवडणूक झाली. सोईचे राजकारण करत असतील तर कार्यकर्त्यांनी काय करायचे. आपण स्वाभिमान सोडला नाही, आपण निष्ठा सोडली नाही. 2019 ला मी इथं प्रचार केला. ज्यांच्या विरोधात प्रचार केला त्याच्यासाठी मी आजही त्याच्यासाठी प्रचार करण्याठी आलो. काहींनी अजित पवार हे ज्यांनी माझ्या भावाला पाडलं त्याच्यासाठी अर्ज दाखल करायला आलेत, असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांनी टोला लगावला आहे.
2014 नंतर एकही कंपनी या भागात आली नाही इथल्या कंपन्या गुजरातला गेल्या. या भागात कंपनी आल्या नाहीत. इथे लोकांचं काय होणार? जर तुम्ही इथला विकास करणार नसेल आणि गुजरातचा विकास करणारा असाल. तर या निवडणुकीत ही स्वाभिमानी जनता भाजप आणि त्यांच्या मित्रपक्ष उत्तरे दिल्याशिवाय राहणार नाही. काल इथं सभा झाली मात्र इथल्या उमेदवार बद्दल बोलण्यासारखं काही नसल्याने ते काही बोललेच नाही. इथे तुमच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. जे साहेबांचे झाले नाही ज्यांनी साहेबाला सोडलं त्यांना ही जनता जागा दाखवितील, असंही रोहित पवारांनी यावेळी म्हटलं.