पिंपरी चिंचवड : पिंपरीमध्ये 4 वर्षांच्या चिमुरडीची जन्मदात्रीने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या हत्येप्रकरणी 22 वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली. (Pimpari Mother kills own four years old daughter)
पिंपरी चिंचवडमधील सांगवी परिसरात घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सविता काकडे असं 22 वर्षीय निर्दयी आईचं नाव आहे, तर 4 वर्षीय रिया काकडे या चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला.
सविताच्या सासूचा आज (सोमवार 27 जुलै) दशक्रिया विधी होता. त्यासाठी कुटुंबातील इतर सदस्य आळंदीला गेले होते. ही संधी साधून तिने पोटच्या मुलीचा जीव घेतला.
हेही वाचा : सासूकडून सतत टोमणे, कंटाळलेल्या सूनेकडून बॅटने हत्या
रिया खूप त्रास देते, अशी महिलेची तक्रार होती. या कारणावरुनच तिने मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. क्रौर्याची परिसीमा म्हणजे सविताने आधी लेकीचं फरशीवर डोकं आपटलं. त्यानंतर गळा आवळळून जीव गेल्याची खात्री केली, अशी प्राथमिक माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे.
सविताच्या सासूच्या दशक्रिया विधीसाठी कुटुंबातील सदस्य सकाळी दहा वाजता आळंदीला गेले होते. काकडे कुटुंबीय दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास घरी परतले, तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला. सांगवी पोलिसांकडून निर्दयी आईला अटक करण्यात आली आहे.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
विवाहबाह्य संबंधाचा संशय, नागपुरात पत्नी आणि तिच्या मित्राची हत्या https://t.co/zdQ63j8mHZ
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 27, 2020