अबकी बार…; आदित्य ठाकरेंचा मावळातून भाजपवर हल्लाबोल

| Updated on: Apr 23, 2024 | 4:54 PM

Aditya Thackeray on BJP : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. मावळचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये गेले असता आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार घणाघात केला आहे.

अबकी बार...; आदित्य ठाकरेंचा मावळातून भाजपवर हल्लाबोल
Follow us on

संजोग वाघेरे अर्ज भरायला गेले आहेत. मी त्यांना कानात सांगितलं. तुम्ही फक्त अर्ज भरा. अर्ज भरताना त्यात चूक होऊ देऊ नका. जनतेने ही ठरवलं आहे, कोणती चूक व्हायला द्यायची नाही. अब की बार 400 पार हे भाजप म्हणत. पण आम्ही दिल्लीत जाऊन काय म्हटलं, अब की बार तडीपार…, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे आज पिंपरी चिंचवडमध्ये होते. तेव्हा त्यांनी स्थानिकांना संबोधित केलं.

आदित्य ठाकरेंचा स्थानिकांना सवाल

गेली दोन वर्षे अवकाळी पाऊस, दुष्काळ झालं. त्यावेळी एकतरी गद्दार मंत्री शेताच्या बांधावर आला का? मदत मिळाली का? मी खोटं बोलतोय का? त्यामुळं साध्याच केंद्रातील आणि राज्यातील सरकार पुढची पाच वर्षे परवडणार आहे का? शेतकरी दिल्लीकडे आंदोलन घेऊन निघाले होते. तेंव्हा भाजप सरकारने लाठ्या चालवल्या. गोळीबार केला. अशा भाजपला तुम्ही मतदान करणार का?, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.

भाजपवर निशाणा

युवा वर्गाने सांगावं, गेली पाच वर्षे तुम्ही पाहिलेली आहेत. कोरोना मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आणि सरकारने कसं कार्य केलं, हे प्रकर्षाने दिसत होतं. पण ह्या सरकारने इथले प्रकल्प घालवले. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प जाऊ नये म्हणून मी स्वतः आंदोलन केले. तो प्रकल्प इथं झाला असता तर आपल्याला नोकऱ्या मिळाल्या असत्या का? प्रकल्प, वर्ल्ड कप मॅच हे सगळं गुजरातला पळवले. ठराविक राज्याचा विकास, इतर राज्यांची राख आणि गुजरातमध्ये रांगोळी. अशी राखरांगोळी या सरकारने केली आहे, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

महिला भगिनी आपल्या पाठीशी आहेत. उद्धव ठाकरेंवर या महिलांना खूप विश्वास आहे. तुम्ही सांगा आत्ताच्या सरकारमध्ये तुम्हाला सुरक्षित वाटतं का? महिलांवर अन्याय करणाऱ्या नेत्यांना पद देतात. गुंड नेत्यांसोबत बाळगत आहेत, मंत्रालयात येऊन रिल्स करतात. बिलकीस बानो वर भयानक बलात्कात झाला. त्यातील आरोपींना प्रचारावेळी गुजरात सरकारने बाहेर काढलं. आज ते प्रचार करतात. मुळात बलात्कार करणाऱ्यांना फाशी व्हायला, मात्र इथं काय घडतंय?, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला आहे.