भाजप आमदाराच्या वाढदिवसानिमित्त फॅशन शोचे आयोजन, महापौरांसह नगरसेविकांचे विनामास्क रॅम्पवॉक

| Updated on: Feb 23, 2021 | 1:17 PM

यावेळी कोरोनाच्या कोणत्याही नियमांचे पालन करण्यात आले नाही.  (Pimpri Chinchwad Mayor Not Follow Corona Rules)

भाजप आमदाराच्या वाढदिवसानिमित्त फॅशन शोचे आयोजन, महापौरांसह नगरसेविकांचे विनामास्क रॅम्पवॉक
Follow us on

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांच्याकडून कोरोना नियमांना हरताळ फासण्यात आला आहे. भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला तुफान गर्दी  पाहायला मिळाली. तसेच यावेळी कोरोनाच्या कोणत्याही नियमांचे पालन करण्यात आले नाही.  (Pimpri Chinchwad Mayor Not Follow Corona Rules)

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मिस अँड मिसेस फॅशन शो च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांच्यासह भाजपच्या नगरसेविकेनेही हजेरी लावली. मात्र या कार्यक्रमादरम्यान कोरोनाच्या सर्व नियमांना हरताळ फासण्यात आल्या.

या कार्यक्रमासाठी आलेले अनेक प्रेक्षकांना तोंडाला मास्कही लावला नव्हता. तसेच यावेळी सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला होता. यावेळी महापौरांसह बहुतांश नगरसेविकांनी विनामास्क रॅम्पवॉक केलं. या कार्यक्रमाला मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेही उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड पोलिसांकडून परवानगी देण्यात आली होती. मात्र सभागृहाच्या पन्नास टक्के उपस्थिती ठेवणं अपेक्षित होतं. पण प्रत्यक्षात ही संख्या अधिक असल्याचं दिसून आलं. पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहे. मात्र महापौर आणि नगरसेवकांकडूनच नियमांची पायमल्ली केली जात आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये नाईट कर्फ्यू

दरम्यान पिंपरी-चिंचवड शहरात आजपासून रात्री 11 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसेंदिवस वाढती कोरोना रुग्णसंख्या या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार आणि जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यानुसार शहरात ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. यावेळी काही नागरिकांवर कारवाई देखील करण्यात येत आहे.  (Pimpri Chinchwad Mayor Not Follow Corona Rules)

संबंधित बातम्या : 

पुण्यात कोरोनाच कहर वाढला; कोरोनामुक्त, कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाण सारखेच, चिंता वाढली

धक्कादायक! सकाळी लग्न, संध्याकाळी कोरोना, वधू आणि वधूपिताही पॉझिटिव्ह; संपर्कातील वऱ्हाडी गायब