पिंपरी – मध्यप्रदेशच्या अट्टल दरोडेखोरांसोबत पिंपरी- चिंचवड पोलिसांची झटापट झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरोडेखोरांनी पोलिसांच्या अंगावर गाड्या घातल्याने एक पोलिस गंभीर जखमी जखमी झाला आहे. ही घटना आज साडेअकरा -बारा वाजताच्या सुमारास उर्से टोलनाक्यावर घडली आहे. अशी घडली घटना मध्यप्रदेश येथील अट्टल गुन्हेगार दोन मोटारीतून पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर जाणार असल्याची माहिती पिंपरी- चिंचवड पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ उर्से टोल नाक्यावर सापळा रचला या दरम्यान सकाळी साडेअकरा बाराच्या सुमारास संशयित वाहन टोलनाक्यावरून पुढे सरकत होती. त्या वेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र असता दरोडेखोरांनी थेट पोलिसांच्या अंगावर गाड्या घालण्यास सुरुवात केली.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.