तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात अजित पवार यांची सभा झाली. या सभेवेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याबाबत अजित पवारांनी विधान केलं. त्यांच्या या विधानाची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया येत आहेत. आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांना आम्ही आबांच्या जागी बघत होतो. ते आमच्या कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती होते. त्यांच्याकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती. या आरोपांचं खंडन करायला आबा नाहीत. आपली संस्कृती सांगते हयात नसलेल्या व्यक्तीबद्दल आपण बोलत नाहीत, असं स्मिता पाटील यांनी म्हटलं आहे.
आर. आर. पाटील हे गृहमंत्री असताना त्यांनी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांची उघड चौकशी व्हावी. या फाईलवर त्यांनी सही केली, असं अजित पवारांनी म्हटलं. आबांना सांगतो होतो की तंबाखू खाऊ नका. तरी ते माझ्या नकळत ते तंबाखू खायचे, असं अजित पवार म्हणाले. त्यावर स्मिता पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. अजित पवारांच्या वक्तव्याने खूप वाईट वाटलं. दादांनी आबांच्या पश्चात आमचं पालकत्व स्वीकारलं होतं. साडेनऊ वर्षानंतर आबांविषयी अजितदादा ही खदखद व्यक्त करतायत. याच वाईट वाटतंय. दुसरं कोणी बोललं असतं तर वाईट वाटलं नसतं. पण अजितदादा आमच्यासाठी वडीलधारे आहेत. त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, असं स्मिता यांनी म्हटलं आहे.
येन निवडणुकांच्या तोंडावर अशी खदखद तासगाव येथे येऊन व्यक्त करतायत. याच दुःख वाटतंय. राजकारणातील समीकरण बदलली आहेत. आरोप- प्रत्यारोप होतात. कुठल्याही आरोपच खंडन करायला आबा हयात नाहीत. आपली संस्कृती आहे की, एखादी व्यक्ती गेल्यानंतर आपण तिच्याबद्दल बोलत नाहीत. आबा नाहीत, आणि असे आरोप होत आहे. हे योग्या वाटत नाही, असं स्मिता पाटील यांनी म्हटलं आहे.
माझा भाऊ रोहित पाटील याच्याशी बोलणं झालं. माझं कुटुंब, मी, बहीण, रोहित हे सर्व जण आबांच्या जागी आम्ही अजित दादांना बघत होतो. वडील या दृष्टीकोनात बघत होतो. घरातील व्यक्ती होम पिचवर येऊन बोलतायत, याच वाईट वाटलं, असं स्मिता पाटील म्हणाल्यात.