15 नव्या इलेक्ट्रिक बसेस पुणेकरांच्या सेवेत दाखल, जाणून घ्या बसमध्ये काय आहे खास?

| Updated on: Nov 23, 2021 | 11:27 PM

सध्याच्या प्रदुषणाच्या समस्येवर मात करण्याचा सर्वच जण प्रयत्न करत आहेत. पुण्याची पीएमपीएमएल या प्रयत्नात आघाडीवर आहे. कारण त्यांच्या बसच्या ताफ्यातल्या जवळजवळ 150 हून अधिक बस या इलेक्ट्रिक बसेस आहेत आणि त्यात अजून 15 बसेसची आज भर पडली आहे.

15 नव्या इलेक्ट्रिक बसेस पुणेकरांच्या सेवेत दाखल, जाणून घ्या बसमध्ये काय आहे खास?
PMPML electric bus
Follow us on

पुणे : सध्याच्या प्रदुषणाच्या समस्येवर मात करण्याचा सर्वच जण प्रयत्न करत आहेत. पुण्याची पीएमपीएमएल या प्रयत्नात आघाडीवर आहे. कारण त्यांच्या बसच्या ताफ्यातल्या जवळजवळ 150 हून अधिक बस या इलेक्ट्रिक बसेस आहेत आणि त्यात अजून 15 बसेसची आज भर पडली आहे. (PMPML get 15 new electric buses from olectra greentech)

ऑलेक्ट्रा ग्रीनटेक आणि इव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेडने (EVEY) पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ला इलेक्ट्रिक बसेसचा नवा लॉट वितरित करण्यास सुरुवात केली. कंपनीला जानेवारी 2021 मध्ये पीएमपीएमएलकडून 350 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर मिळाली होती.

नव्या इलेक्ट्रिक बसेसमध्ये काय आहे खास?

प्रवाशांच्या सुखसोयीसाठी वातानुकूलित बसेसमध्ये इलेक्ट्रॉनिक कंट्रोल एअर सस्पेंशन आहे. बसण्यासाठी 33 आसने + व्हीलचेयर, सीसीटीव्ही कॅमेरे, आपत्कालीन बटन, मोबाइल चार्जिंगसाठी यूएसबी सॉकेट्स देण्यात आले आहेत. लिथियम-आयन बॅटरीमुळे ही बस सिंगल चार्जमध्ये 200 किमीपेक्षा अधिक रेंज देते. तसेच बसमध्ये रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम आहे.

PMPML electric bus

या अत्याधूनिक इलेक्ट्रिक बसमध्ये रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम आहे, ज्यामुळे ब्रेक लावल्यावर तयार होणाऱ्या उर्जेचा विनीयोग बस परिचालनात केला जातो. हाय-पॉवर चार्जिंग सिस्टम बॅटरीला 2-5 तासांच्या दरम्यान पूर्ण रीचार्ज करते. या बसला पुढे आणि मागे दोन्ही बाजूला डिस्क ब्रेक्स असल्याने अतिशय सुरक्षित प्रवासाची हमी यातून मिळते.

फक्त प्रवास सुरक्षित नाही तर आरामदायी करणाऱ्या या सर्व बसेस लवकरात लवकर पुणेकरांच्या सेवेत येतील अशी अपेक्षा आहे. मेट्रो बरोबरच या इलेक्ट्रिक बसमध्ये गारेगार प्रवासाचा अनुभव घेत आपल्या कामाच्या ठिकाणी पुणेकर वेळेत पोहोचतील अशी आशा करता येईल.

PMPML electric bus

इतर बातम्या

‘मोदी सहजासहजी माघार घेणारे नाहीत, माफी मागितली म्हणजे त्यांचा होमवर्क झालेला होता’, जयंत पाटलांचा खोचक टोला

(PMPML get 15 new electric buses from olectra greentech)