दौंड, पुणे : शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील दुकानात चोरी (Theft) झाली आहे. या परिसरातील प्रकाश इलेक्ट्रॉनिक्स दुकानात ही मोठी चोरी झाली आहे. चोरट्यांनी रात्रीच्या वेळी दुकानाच्या पाठीमागील बाजूला असलेल्या छोट्या खिडकीचे गज वाकवून दुकानात प्रवेश केला. यावेळी तब्बल 30 लाख रुपये किंमतीचे मोबाइल आणि घड्याळे चोरट्यांनी लंपास केले आहेत. हा सगळा चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये (CCTV) कैद झाला आहे. या संदर्भात दुकानाचे मालक नीलकमल लुंड यांनी फिर्याद दिली असून दौंड पोलीस ठाण्यात (Daund Police Station) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंडचे डीवायएसपी राहुल धस यांनी चोरी झालेल्या दुकानाची पाहणी केली आहे. दौंड शहराच्या मुख्य बाजारपेठेतील आणि पोलीस उप अधीक्षक कार्यालयामागील प्रकाश इलेक्ट्रॅानिक्स या दुकानातून जवळपास 31.25 लाख रुपयांचे मोबाइल संच व घड्याळे चोरट्यांनी चोरून नेली आहेत.
प्रकाश इलेक्ट्रॅानिक्स या दुमजली दुकानातील ही चोरी बुधवारी (ता. 18) सकाळी साडेनऊ वाजता निदर्शनास आली. दुकानाच्या तळघरात अवघी 9 इंच उंचीची व 3 फूट लांब असलेल्या खिडकीचे लोखंडी गज वाकवून आणि त्यासमोरील फ्रिजचे बॉक्स सरकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील 31 लाख 15 हजार 164 रूपये मूल्य असलेले मोबाइल संच व मनगटी घड्याळे आणि 10 हजार रूपयांची रोकड चोरीस गेली आहे, अशी प्राथमिक माहिती दुकानाचे मालक नीलकमल लुंड यांनी दिली. या बाबत दौंड पोलीस ठाण्यात संध्याकाळपर्यंत फिर्याद दाखल झाली नव्हती.
#Pune : खिडकीचे लोखंडी गज वाकवून चोरट्यांनी लंपास केले मोबाइल्स आणि घड्याळं, पुण्यातल्या दौंड पोलिसांत गुन्हा दाखल
पाहा व्हिडिओ – @puneruralpolice #theft #crime
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmGZMLmk pic.twitter.com/rY9xcgiUcN— TV9 Marathi (@TV9Marathi) May 19, 2022
उपअधीक्षक राहुल धस व निरीक्षक विनोद घुगे तसेच पोलीस पथकाने घटनास्थळी भेट दिली. पुणे येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक व ठसे तज्ज्ञ यांच्या पथकाला पाचारण करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत.