पुणे: राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळीची पार पडली आहे. ग्रामपंचायत निकालातील वेगवेगळ्या गोष्टी आता समोर येत आहेत. युवकांपासून ते जेष्ठ नागरिकांचा सहभाग ग्रामपंचायत निवडणुकीत दिसू आला. इंदापूर तालुक्यातील शहा गावातील पूनम कडवळे तरुण ग्रामपंचायत सदस्य ठरली आहे. पूनम कडवळे 21 वर्षांची असून ती सर्वात लहान वयाची ग्राम पंचायत सदस्य असल्याचा दावा बहुजन मुक्ती पार्टीनं केला आहे. (Poonam Kadawale elected as youngest member of Gram Panchayat in Pune District)
इंदापूर तालुक्यातील शहा ग्रामपंचायतीमध्ये बहुजन मुक्ती पार्टीॉची पूनम कडवळे विजयी झाली आहे. पूनम कडवळे ही सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य असल्याचा दावा बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने करण्यात आलेला आहे. पूनम कडवळे पुणे जिल्ह्यातील सर्वात लहान ग्रामपंचायत सदस्य आहे. पूनम कडवळे इंदापूरच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. पूनम कडवळे बी.ए. भाग 3 च्या वर्गात शिकत आहे. तिला आता ग्रामपंचायतीमध्ये काम करण्याची संधी मिळालेली आहे.
पूनम कडवळे हिनं तिला निवडून दिलेल्या सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. पुढील काळात नागरिकांच्या हितासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी काम करणार असल्याचं तिनं सांगितलं आहे. गावातील मूलभूत सोयी सुविधा नागरिकांना देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, असं कडवळे हिनं सांगितलं आहे.
सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात घाटणे येथील 21 वर्षाचा तरुणही विजयी झालाय. यासह तो सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य ठरलाय. ऋतुराज रवींद्र देशमुख असं या तरुणाचं नाव आहे. विशेष म्हणजे त्याच्या पॅनललाही मोठा विजय मिळालाय. आता सरपंचपदाचं आरक्षण सोडतीनंतर त्याला संधी मिळाली, तर तो सर्वात तरुण सरपंच होण्याचीही शक्यता आहे
ऋतुराज सध्या 21 वर्षाचा असून नुकतेच त्याचे बीएससीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता तो LLB ला प्रवेश घेणार आहे. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ऋतुराजने आपल्या घाटणे गावात निवडणुकीसाठी स्वत:चं पॅनेल उभं केला. निवडणुकीच्या काळात ऋतुराजने तयार केलेला वचननामा चांगलाच चर्चेचा विषय ठरला. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्वतःचा वचननामा तयार करून गावच्या विकासाचा रोडमॅप सांगणारा ऋतुराज वेगळा ठरला.
संबंधित बातम्या:
महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : जळगावात महाविकास आघाडीच्या ताकदीसमोर भाजप निष्प्रभ
(Poonam Kadawale elected as youngest member of Gram Panchayat in Pune District)