President Ramnath Kovind in Pune : कर्तृत्ववान महिलांनी उंचावली महाराष्ट्राची मान; रामनाथ कोविंद यांचे पुण्यात गौरवोद्गार

| Updated on: May 27, 2022 | 4:37 PM

महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वराचा जन्म याठिकाणी झाला. संत नामदेव यांच्यामुळे ही भूमी पावन झाली. याच भूमीवर दगडूशेठ गणपतीचे मंदिर असणे अत्यंत चांगली गोष्ट आहे. सुरुवातीच्या काळापासूनच महाराष्ट्र सगळ्याबाबतीत अग्रेसर होता, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.

President Ramnath Kovind in Pune : कर्तृत्ववान महिलांनी उंचावली महाराष्ट्राची मान; रामनाथ कोविंद यांचे पुण्यात गौरवोद्गार
राष्ट्रपती रामनाथ कोविंद (संपादित छायाचित्र)
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील (Pratibha Patil) यांच्याकडून खूप काही शकलो आहे. आतापर्यंत अनेकवेळा महाराष्ट्रात येण्याची संधी मिळाली. प्रतिभा पाटलांसोबत चर्चा करण्याची संधी मिळाली. आज त्यांच्या बोलवण्यारून मी येथे आलो. महाराष्ट्राची मान त्यांनी उंचावली आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी काढले आहेत. ते पुण्यात बोलत होते. लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या 125व्या वर्षाचा शुभारंभ सोहळा पार पडला, यावेळी राष्ट्रपती कोविंद बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रमुख उपस्थिती होती. तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. महाराष्ट्राचा इतिहास (History of Maharashtra) तसेच गौरवशाली परंपरा याचा राष्ट्रपती कोविंद यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.

‘भगवान दत्तात्रेयाची कृपा’

ते म्हणाले, की भगवान दत्तात्रेयाची कृपा आहे. आज मला इकडे येता आले. महाराष्ट्राची भूमी पवित्र आहे. छ्त्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली स्वराजाची हाक सर्वांना एक करत आहे. राजकारणच नव्हे तर सामाजिक कार्यातही महाराष्ट्र पुढे आहे. मुलींची पहिला शाळा महाराष्ट्रातच सुरू झाली. पहिला महिला डॉक्टरही याच महाराष्ट्रातील आहे. डॉ. आनंदीबाई जोशी यांनी भूमिला अभिमान बाळगायला शिकवला. भारताच्या पहिला महिला राष्ट्रपतीचा मान मिळवत प्रतिभा पाटील यांनी या भूमीला पुन्हा एकदा मान उंचावण्याची संधी दिली, असे रामनाथ कोविंद म्हणाले.

महाराष्ट्रातील महिलांचे कौतुक

महाराष्ट्रातील महिलांनीदेखील अनेक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली आहे. सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा याच पुण्यात सुरू केली. पहिली महिला डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी या भूमिला अभिमान बाळगायला शिकवला. भारताच्या पहिला महिला राष्ट्रपतीचा मान मिळवत प्रतिभाताई पाटील यांनी या भूमीला पुन्हा एकदा मान उंचावण्याची संधी दिली, असं म्हणत त्यांनी महाराष्ट्रातील महिलांचे कौतुक केले.

हे सुद्धा वाचा

‘संतांमुळे भूमी पावन’

महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वराचा जन्म याठिकाणी झाला. संत नामदेव यांच्यामुळे ही भूमी पावन झाली. याच भूमीवर दगडूशेठ गणपतीचे मंदिर असणे अत्यंत चांगली गोष्ट आहे. सुरुवातीच्या काळापासूनच महाराष्ट्र सगळ्याबाबतीत अग्रेसर होता, असे कोविंद म्हणाले. दरम्यान, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या उप कुलगुरू डॉ. भायश्री पाटील, बोन्साय आर्ट आणि पर्यावरण जागरूकता विषयात पहिल्या डॉक्टरेट महिला डॉ. प्राजक्ता काळे यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला.