पुणे : पुणे शहर पोलीस दलातील 6 हजार 500 पोलिसांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 84 पोलिसांना कोरोना लसीचे दोन डोस देण्यात आले आहेत. मात्र यातील काही पोलिसांना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. (Pune 1 lakh Corona Vaccine available)
पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. पुण्यात कोरोना संसर्ग वाढल्यानंतर पोलीस दलातील42 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 16 पोलीस कर्मचारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर 26 पोलीस कर्मचाऱ्यांवर वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने घरीच विलगीकरणात उपचार घेतले जात आहे. त्यामुळे पुणे शहर पोलीस दलात वर्षभरात 1 हजार 530 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.
पुण्यातील 6500 पोलिसांना कोरोना लस
दरम्यान पुणे पोलिसात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साडेसहा हजार पोलिसांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 84 पोलिसांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. यातील काही पोलिसांनी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर ते पुन्हा कोरोनाबाधित झाले आहेत. याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांचे मत विचारात घेतले जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.
पुण्यात कोरोना लसीचे 1 लाख डोस उपलब्ध
दरम्यान सध्या पुणे जिल्ह्यात कोरोना लसीचे 1 लाख डोस उपलब्ध आहेत. यामध्ये कोव्हॅक्सिनच्या 50 हजार आणि कोव्हिशिल्ड लसीच्या 50 हजार डोसचा समावेश आहे. कोव्हिशिल्ड लसीच्या 50 हजार डोसपैकी पुणे महापालिकेला 20 हजार डोस दिले जाणार आहे. तर पिंपरी-चिंचवडला 10 हजार, ग्रामीण भागासाठी 20 हजार डोस वितरीत केले जाणार आहेत. (Pune 1 lakh Corona Vaccine available)
तर कोव्हॅक्सिनच्या 50 हजार डोसपैकी पुणे महापालिकेला 25 हजार, पिंपरी-चिंचवड महापालिकेला 10 हजार, तर ग्रामीण भागाला 15 हजार लसींचे डोस वितरित केले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी दिली.
काल (15 मार्च) दिवसभरात 678 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर पुण्यात काल 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी एकजण पुण्याबाहेरील आहे. पुण्यात सध्या 370 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण आकडेवारीचा विचार केला तर पुण्यात आतापर्यंत 2 लाख 19 हजार 285 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यातील 2 लाख 2 हजार 339 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 11 हजार 984 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 4 हजार 962 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Pune 1 lakh Corona Vaccine available)
LIC कडून नव्या बचत योजनेची घोषणा; जबरदस्त फायदे आणि बरंच काही https://t.co/dbWpu8VT6Y #LIC | #lifeinsurance
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 16, 2021
संबंधित बातम्या :
मोठी बातमी! ठाकरे सरकारकडून राज्यात नवी नियमावली; लग्न समारंभात ‘एवढ्याच’ लोकांना परवानगी