पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पुणे युनिटनुसार, गेल्या तीन वर्षांत, विभागातर्फे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा किंवा लाच मागितल्याच्या संशयावरून 41 छापे टाकले. बेहिशेबी मालमत्ता किंवा लाच मागितल्याच्या तक्रारींवरून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या (Pune public health department) सुमारे 52 अधिकाऱ्यांवर एसीबीने छापे टाकले आहेत. यातील बहुतांश प्रकरणे सुनावणीस आहेत. राज्यभरातील आठ विभागात 9,19,595 रुपयांचे छापे टाकण्यात आले आहेत. 2020मध्ये, पुणे ACBने 16 छापे टाकले ज्यात सुमारे 19 सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी 4,41,195 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी दोषी आढळले. 2021मध्ये, ACBने 15 छापे टाकले ज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 21 अधिकार्यांवर 3,95,900 रुपयांची लाच मागितल्याबद्दल गुन्हा दाखल (Filed a complaint) करण्यात आला. 2022पर्यंत ACBने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 12 अधिकार्यांवर 82,500 रुपयांची लाच मागितल्याबद्दल 10 छापे टाकले.
विभागाच्या म्हणण्यानुसार, आमच्याकडे नोंदवलेल्या प्रत्येक प्रकरणाची दखल घेणे आमचे कर्तव्य आहे. विशिष्ट विभागांना लक्ष्य करणारे आमचे छापे आम्ही वेगळे करू शकत नाहीत. विशिष्ट विभागांकडून तक्रारी येण्याची शक्यता वाढल्याने त्यांचे छापेही वाढले आहेत. नुकतेच महाराष्ट्र एसीबीच्या पुणे युनिटने पुणे जिल्हा सिव्हिल सर्जन आणि इतर दोघांना औंध जिल्हा रुग्णालयातून एका खासगी डॉक्टरकडून लाच मागितल्याच्या आरोपाखाली अटक केली. फिर्यादीनुसार, सोनोग्राफी केंद्र चालविण्याचा परवाना नूतनीकरण करण्यासाठी डॉ. माधव बापूराव कणकवले यांनी तक्रारदाराकडे 40 हजार रुपयांची लाच मागितली. डॉक्टरांनी आरोपीविरुद्ध एसीबी, पुणे कार्यालयात तक्रार दाखल केली.
एसीबी पुणे येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमांनुसार नियुक्त केलेल्या पदांवर असलेले सरकारी डॉक्टर सरकारने नियुक्त केलेल्या शुल्काव्यतिरिक्त लोकांकडून पैसे घेऊ शकत नाहीत. केवळ आरोग्य विभागच नाही, तर इतर कोणत्याही विभागात लाच मागण्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून वाढीस लागले आहेत. कोणी लाच मागितल्यास लोकांनी पुढे येऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.