मुरलीधर मोहोळ माझा मावस भाऊ, तुटलेला नळ दुरुस्त करण्याची…; मतदानानंतर प्रविण तरडे काय म्हणाले?

| Updated on: May 13, 2024 | 3:57 PM

Actor Pravin Tarde on Murlidhar Mohol and Loksabha Election 2024 : मतदानानंतर प्रविण तरडे काय म्हणाले?; मुरलीधर मोहोळ माझा मावस भाऊ, तुटलेला नळ दुरुस्त करण्याची... पुण्यात टीव्ही 9 मराठीशी बोलताना प्रविण तरडे यांनी नेमकं काय म्हटलं? वाचा सविस्तर......

मुरलीधर मोहोळ माझा मावस भाऊ, तुटलेला नळ दुरुस्त करण्याची...; मतदानानंतर प्रविण तरडे काय म्हणाले?
Follow us on

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी त्यांच्या पत्नी स्नेहल तरडे यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर प्रविण तरडे यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. आज मतदान केंद्रावर ज्या रांगा लागल्यात. जी गर्दी झाली आहे, ते पाहून मला पहिल्यांदा आनंद झालेला आहे. पहिल्यांदा खूप वेळ रांगेत उभे राहणं आम्ही सेलिब्रेट केलं. पुण्याचे संस्कार आणि पुण्याची संस्कृती ही या रांगांमधून दिसली, असं प्रविण तरडे म्हणाले.

प्रविण तरडे काय म्हणाले?

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचं प्रविण तरडे यांनी कौतुक केलं. मुरलीधर मोहोळ मावस माझा भाऊ आहेय नात्यागोत्यातला माणूस जर उभा असेल तर त्याच्या पाठीशी आपण उभ राहिला पाहिजे.त्यामुळे माझ्या शिकल्या सवरलेल्या भावासाठी मी शूटिंग बंद करून मैदानात उतरलेलो आहे. त्याच्यासाठी प्रचार केला, असं प्रविण तरडेंनी म्हटलं.

आताची निवडणूक ही लोकशाहीची निवडणूक आहे. माझ्या घरातला तुटलेला नळ त्या खासदाराने येऊन दुरुस्त करावा अशी माझी अपेक्षा नाही. मी खासदार देशासाठी, देशांच्या सुरक्षित सीमांसाठी, देशातील उत्तम उत्तम कायद्यांसाठी निवडून देत आहे. मतदानाची सुट्टी घेऊन ट्रीप एन्जॉय करायला गेलेल्या प्राण्यांबद्दल न बोललेलं बरं, असंही प्रविण तरडे म्हणाले. प्रविण तरडे यांच्या पत्नी स्नेहल तरडे यांनी मतदान प्रक्रियेवर भाष्य केलं. महिलांनी कुठलीही सबब न सांगता घरातून बाहेर पडून मतदान करावं, असं आवाहन प्रविण तरडे यांच्या पत्नी स्नेहल तरडे यांनी केलं आहे.

सलील कुलकर्णी यांनी बजावला मतदानाचा हक्क

प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी यांनी मुलगा शुभंकर कुलकर्णी याच्यासह मतदानाचा हक्क बजावला. सोशल मीडियावर भांडून काहीही होतं. विचार करून मतदान करायला हवं. जसा लहानपणी लहान बाळाला पोलिओ दिला जातो. लहान बाळाच्या वॅक्सिनेशन केलं जातं. तसंच मतदान प्रक्रिया ही सुद्धा मूलभूत गोष्ट आहे.- नुसतं सोशल मीडियावर, कॅफेमध्ये बसून चर्चा करायची नाही. तर घराबाहेर पडायचं आणि रांगेत उभे राहून मतदान करायचं. असं मी आवाहन करतो, असं सलील कुलकर्णी यांनी म्हटलं.