Omicron cases: पुण्यात उद्यापासून टेस्टिंग आणि ट्रेसिंग; ओमिक्रॉनचे रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन लागलं कामाला

| Updated on: Dec 05, 2021 | 8:10 PM

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ओमिक्रॉनचे सात रुग्ण आढळताच प्रशासन कामाला लागले आहे. ओमिक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी उद्यापासून पुण्यात टेस्टिंग आणि ट्रेसिंगला सुरुवात करण्यात येणार आहे.

Omicron cases: पुण्यात उद्यापासून टेस्टिंग आणि ट्रेसिंग; ओमिक्रॉनचे रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन लागलं कामाला
Omicron cases
Follow us on

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ओमिक्रॉनचे सात रुग्ण आढळताच प्रशासन कामाला लागले आहे. ओमिक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी उद्यापासून पुण्यात टेस्टिंग आणि ट्रेसिंगला सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच बेड आणि ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचे आदेशही रुग्णालयांना देण्यात आले आहेत.

ओमिक्रॉनचे रुग्ण आढळताचं जिल्ह्याचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. ओमिक्रॉन बाधित आढळलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील नागरिकांच उद्यापासून ट्रेसिंग आणि टेस्टिंग केलं जाणार आहे. उद्यापासून व्यक्तींच्या संपर्कातील मोहिमेला होणार सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांनी दिली. तसेच ऑक्सिजन बेड, हॉस्पिटलमधील बेडसंदर्भात पुरेसं नियोजन, तसेच ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचे आदेशही पवार यांनी सर्व रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत.

सहाही जण नायजेरियातील

पिंपरी-चिंचवडमध्ये सापडलेले सहाही जण नायजेरियातून आले होते. 24 नोव्हेंबर रोजी नायजेरियातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी एक 44 वर्षाची महिला आली होती. तिच्या सोबत तिच्या दोन मुलीही होत्या. पिंपरी चिंचवडमध्ये राहणारा तिचा भाऊ, ती आणि तिच्या दोन्ही मुलींसह एकूण सहा जणांचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. त्याचा अहवाल आला असून त्यात या सहाही जणांना लागण झाल्याचं आढळून आलं आहे. तसेच पुण्यातील एका 47 वर्षीय व्यक्तीलाही ओमिक्रॉनची लागण झाली आहे. यात दोन लहान मुलींचाही समावेश आहे.

438 नागरिक परदेशातून आले

पुणे शहरात 438 नागरिक परदेशातून नुकतेच परतले आहेत. त्यापैकी 370 नागरिक मनपा हद्दीतील आहेत. 370 पैकी 335 नागरिकांपर्यंत पोहोचण्यात यश आले आहे. आतापर्यंत 267 नागरिकांची RT-PCR करण्यात आली असून सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

देशातील सर्वाधिक ओमिक्रॉन बाधित रुग्ण पुण्यात

आतापर्यंत पुण्यात एक, पिंपरी-चिंचवडमध्ये 6, डोंबिवलीत एक, कर्नाटकात दोन, दिल्लीत एकाला आणि गुजरातमध्ये एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडची बेरीज करता पुणे जिल्ह्यात देशातील सर्वाधिक ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत.

महापौर इन अॅक्शनमोड

ओमिक्रॉनचा धोका लक्ष्यात घेऊन पुणे महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. विमानतळावर आलेल्या प्रत्येक प्रवाश्याची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. त्याचबरोबर आवश्यकता भासल्यास जम्बो कोविड सेंटर सुरु करण्याच्या तयारी सोबतच लसीकरणाचा वेगही वाढविण्यात आल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेत पुण्यात कोरोनाचे नवीन निर्बंध घालण्यात आले आहेत.

 

संबंधित बातम्या:

Omicron : राज्यात आणखी 7 जणांना ओमिक्रॉन, पिंपरी-चिंचवडमध्ये 5, पुण्यात 1 ओमिक्रॉनबाधित

पुन्हा सैराट ! पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने भावने केली हत्या, बहिणीचं मुंडकं धडावेगळं केलं, महाराष्ट्र हादरला

डोंबिवलीत ओमिक्रॉनचा रुग्ण सापडला तरीही राष्ट्रवादी बेफिकीर, कल्याणमधील कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा