पुणे शहराततील कोरेगाव पार्कमधील कल्याणीनगरमध्ये शनिवारी रात्री कारण आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील अनिस दुधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणावर कायदेतज्ज्ञ ॲड. असिम सरोदे यांनी भाष्य केलं आहे. या प्रकरणामध्ये दोन FIR दाखल होणं ही कायदेशीर चूक आहे. पोलिसांनी दोन FIR मुद्दाम केलेल्या आहेत.कारण त्यांना गुन्ह्याची गंभीरता कमी करायची आहे. IPC मधले 304 A आणि 279 अपघाताचे हे गंभीर कलमं पोलिसांनी मुद्दाम लावलेले नाहीत, असं दिसतंय. त्याबद्दल सुद्धा आम्ही आक्षेप घेतलेला आहे, असं असिम सरोदे म्हणाले.
नागरिकांना वाटत आहे आम्ही सुद्धा या अपघातात असू शकतो. कोणीही श्रीमंत व्यक्ती आमचा अशाच प्रकारे जीव घेऊ शकतो आणि पोलीस त्याच्यावर काहीही कारवाई करणार नाही, ही परिस्थिती चांगली नाही. यामुळे पुण्यातील सगळ्या नागरिकांतर्फे सारंग यादवाडकर यांनी ही बाजू लावून धरली. त्यांचा मी वकील आहे आणि त्यांच्या वतीने आम्ही युक्तिवाद केल्याचं असिम सरोदे यांनी सांगितलं.
मुलगा वयाने लहान असूनही त्याला दारू प्रोव्हाइड करण्यात आली. तो दारू पिला नसता तर अशा बेधुंद पद्धतीने त्यांनी गाडी चालवली नसती. दारू पिल्यामुळे घडलेला हा अपघात आहे. त्यामुळे हे दोन गुन्हे वेगळे करण यामध्ये सुद्धा एक षडयंत्र आहे, असे आमचे म्हणणं आहे. हे सगळं म्हणणं आम्ही मांडल्यानंतर पबचालकांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे, असं असिम सरोदे म्हणाले.
भारतामध्ये वकील आणि नागरिकांनी बेलचं फार जास्त अवास्तव महत्त्व वाढवून ठेवलेलं आहे. कितीही गंभीर गुन्हा असला तरी जामीन झाला पाहिजे, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. या प्रकरणात आरोपी अल्पवयीन आहे. त्यामुळे त्याला जामीन देण आवश्यक होतं. कोर्टाने जामीन दिला यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल काही नागरिकांनी जास्त बोलणं सुरू केलेलं आहे. ते कायद्याची समज नसण्याचे लक्षण आहे, असं विधान असिम सरोदे यांनी केलं आहे.