फक्त ‘ते’ लोकच भाजपसोबत जातील; रोहित पवार यांचं सर्वात मोठं विधान

| Updated on: Feb 15, 2024 | 3:36 PM

Rohit Pawar on Ajit Pawar Group NCP : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सर्वात मोठा दावा केला आहे. जे दोन गट भाजपा सोबत गेलेत त्यांना... रोहित पवारांनी पुण्यात बोलताना अजित पवार गटावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. रोहित पवार नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

फक्त ते लोकच भाजपसोबत जातील; रोहित पवार यांचं सर्वात मोठं विधान
Follow us on

सुनील ठिगळे प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, आंबेगाव, पुणे | 15 फेब्रुवारी 2024 : अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदार, खासदार, नेत्यांनी महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यावर महाविकास आघाडीतून टीका केली जात आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. आणखी काही नेते संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतो. त्यावर रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे. जे लोक त्यांच्या विचारांना बांधील नाहीत ते सर्व भाजपा सोबत जातील. ज्यांनी चुका केल्यात ते भाजपासोबत जातील, असं रोहित पवार म्हणालेत.

रोहित पवार यांचा आंबेगाव दौरा

पुण्यातील आंबेगाव इथं नुकसान भरपाई मिळावी. यासाठी आंबेगाव तालुक्यातील प्रांत कार्यालयासमोर आदिवासी बांधव उपोषणाला बसले. त्यांना भेटण्यासाठी आमदार रोहित पवार हे आले होते. त्यावेळी ते माध्यांमासोबत बोलत होते. जे दोन गट भाजपा सोबत गेलेत. त्यांना विधानसभेला भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवाव्या लागतील, असं रोहित पवार यावेळी म्हणाले.

अजित पवार गटावर टीका

सत्तेत असणारे नेते आणि खास करून भाजपाच्या प्रमुख नेत्यांकडे पैसा आणि दबावतंत्र आहे. काँग्रेसचे एक नेते आता भाजपमध्ये गेले आहेत आणि आणखीन काँग्रेस मधील नेते आमदार भाजपमध्ये जातील. त्याची वेगवेगळी कारणं असू शकतील. भाजपा कडून पक्षात घेण्यासाठी अनेक लोकांना संपर्क केला जात आहे. मात्र जे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला बांधील आहेत ते त्या ठिकाणी राहतील, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

भाजपवर निशाणा

ते कोणाला भाजपमध्ये बोलवितात हे मला सांगता येणार नाही. स्वाभिमानी मराठी माणसं अजून सुद्धा भाजप सोडून इतर पक्षात आहेत. भाजपचा आणि स्वभिमांनाचा दूर दूर पर्यंत संबध येत नाही. आज पवारसाहेबां सोबत जे लोक आहेत. ते कोणीही भाजपमध्ये जाणार नाही, याचे आश्वासन देतो, असं शब्दही रोहित पवार यांनी दिला आहे.

रोहित पवार यांनी पुण्यातील ग्रामीण भागाचा आज दौरा केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नरचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या निधनाबद्दल त्यांच्या घरी सांत्वनपर भेट घेतली. तसंच मंचरमध्येही रोहित पवार गेले होते. तेव्हा त्यांनी तरूणांशी संवाद साधला.