मोहन भागवत यांच्या ‘देव बनण्याच्या’ विधानावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, शहाण्या माणसांने…

| Updated on: Jul 20, 2024 | 1:19 PM

Sharad Pawar on Mohan Bhagwat Statement : मोहन भागवत यांनी झारखंडमध्ये बोलताना 'देव बनण्याच्या'बाबतचं एक विधान केलं. हे विधान नक्की कुणाला उद्देशून आहे. याची सध्या चर्चा रंगली आहे. मोहन भागवत यांच्या विधानावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर...

मोहन भागवत यांच्या देव बनण्याच्या विधानावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, शहाण्या माणसांने...
मोहन भागवत, शरद पवार
Image Credit source: Facebook
Follow us on

सरसंघचालक मोहन भागवत यांनी झारखंडमध्ये बोलताना एक विधान केलं. जो मनुष्य आहेत. पण त्यांच्यात मानवता नाही. या लोकांनी आधी खरं मनुष्य बनलं पाहिजे. काही लोक मानव असताना सुपरमॅन बनू पाहतात. अलौकिक शक्ती असल्याचं म्हणत ते अलौकिक बनू पाहतात. सुपरमॅन बनू पाहतात. पण तो तिथंच थांबत नाही. त्याला वाटतं आपण देव बनलं पाहिजे. तो देवता बनू पाहतो. पण देवता म्हणतात की भगवान आमच्या पेक्षा जास्त मोठे आहेत. तर मग तो मनुष्य भगवान बनू इच्छितो. आता हे लोक इथं थांबणार आहेत की त्यापुढेही कुठे जायचं आहे?, असं मोहन भागवत म्हणाले. त्यांच्या या विधानावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवारांची प्रतिक्रिया काय?

मोहन भागवत यांनी काय म्हटलंय? याची मला कल्पना नाही. ते कोणाबद्दल बोलले असावेत. आता देव बनायला कोणीतरी निघालं होतं. त्यावर भाजप आणि आरएसएसचेच लोक वक्तव्य करायला लागले आहेत. याची नोंद शहाण्या माणसांनी घ्यावी, असं शरद पवार म्हणालेत.

पुण्यातील आंबेगावमध्ये शरद पवारांनी आज पक्षाची बैठक घेतली. यावरही पवारांनी भाष्य केलं. दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले नाहीत का? हे त्यांना विचारा… मुळात ते किती वर्षे सत्तेत आहेत. 35 वर्षे आमदार, त्यापैकी 25 वर्षे मंत्री आहेत. आता ज्यांना 25 वर्षात विकास करता आला नाही ते आता काहीतरी सांगतात. मुळात हा संधिसाधूपणा आहे. अनेकांना अनेक वर्षे संधी देऊन ही त्यांना कामं करता आलेली नाहीत. जनतेला न्याय देता आलेलं नाही, याला उत्तर आता शोधावं लागेल. यासाठी राज्याची सत्ता हातात घ्यावी लागेल, असं शरद पवार म्हणाले.

पूजा खेडकर प्रकरणावर प्रतिक्रिया

वादग्रस्त पूजा खेडकर प्रकरणावरही शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. मी जी माहिती घेतली, ती देशाच्या दृष्टीने चिंताजनक आहे. आपल्या देशात आणि राज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक परंपरा आहे. त्या चौकटीच्या बाहेर अधिकारी जायला लागले, ही अतिशय गंभीर बाब आहे. केंद्र सरकार याला अतिशय गांभीर्याने दखल घेतील, योग्य ती कारवाई करतील, असं शरद पवार म्हणाले.