पुणे : बॅचलर लाईफ ही काही वेगळीच असते, यात शिक्षण घेत असताना आपल्या करिअरचं काय होईल हा एक मोठा ताण डोक्यात असतो, पण ताण थोडासाही जाणवत नाही, कारण आजबाजूला हा ताण सांभाळून घेण्यासाठी असतात बॅचलर्स. भांडणं होतात, पण ती गोडवा निर्माण करतात. खाणेपिणे, अभ्यास करणे, कामावर जाणे, बाहेर फिरायला जाणे, हे सर्वकाही आठवणींचा गुलदस्ताच तयार झाल्यासारखं आहे.जी व्यक्ती होस्टेलला राहिली नाही, जी बॅचलर्सच्या रुममध्ये राहिली नाही, ती व्यक्ती आयुष्याच्या एका सुखद अनुभवाला मूकली असंच म्हणता येईल, अशा लोकांच्या स्वभावात मनमोकळेपणा देखील येत नाही, ४ बॅचलर्स, रुममेट, होस्टेल मेट यांच्यात राहिल्यास तुमच्या स्वभावात सर्वांना सामावून घेण्याचा एक गुण एक स्वभाव तयार होतो.
येथूनच सुरु होते, तुमच्या आयुष्यात मित्र जमवण्याची कसोटी, शेवटी तुम्हाला एक किंवा दोन मित्र राहत नाहीत, तर मित्रांची जत्राच तुमच्याकडे तयार होते. तुमच्या वेगवेगळ्या मित्रांचे वेगवेगळे स्वभाव, त्यांचं बोलणं, त्यांच्या सवयी, त्यांचं विचार करणं हे प्रत्येक जणांचं उदाहरण तुमच्याकडे असतं. मित्रांच्या या गुणवैशिष्ठ्याची शिदोरी मनातल्या मनात कधीही उघडून पाहा, तुम्हाला एकांतात का असेना हसू.
एक मात्र लक्षात असू द्या, तुमचा मित्र छोट्या मोठ्या चोऱ्या करणारा चोर असला, हिशेबाच्या बाबतीत, चहा पाजण्यात पैस काढण्यात कंजुष असला, सतत मुली पटवण्यात लागलेला असला, खोटारडा असला, खूप हुशार असला, त्यावेळी अस्वच्छ राहणारा असला, दुसऱ्यांच्या खोड्या करणारा असला, खूप नालायक असला, तरी मित्र हा मित्रच असतो, कधीही भेटा हा मित्र असतो.
अशा सर्व लोकांना सांभाळून ठेवते ती रुम किंवा होस्टेल, हे जीवन जो जगला तो जगात कुठेही गेला तरी सर्वांमध्ये मिसळतो, तो कधीच कुठेही घाबरून जात नाही. या सर्वांनी सांभाळून ठेवणारी एक रुमधील आचारसंहिता मिळाली आहे.ती म्हणजे रुममधील नियम, बॅचलर मुलांच्या रुममधील नियम एकदा वाचा, कागदावरील हे नियम जसेच्या तसे देत आहोत.
ही रुम आपला परिवार आहे, सर्वांनी नियम पाळावेत.
१) रुम झाडणे, टॉयलेट साफ करणे याचे वेळापत्रक पाळावे, ज्याची टर्न चुकली, त्याला २ वेळेस टर्न असेल टॉयलेट साफ करण्याची.
२) दुसऱ्याचे टूथपेस्ट, साबण, टॉवेल, डोक्याला लावण्याचे तेल, कंगवा वापरु नये, तुमच्यासोबत कुणी गेस्ट आला, तर त्याला हा नियम रुममध्ये पाय ठेवल्यावर लगेच सांगा.
३) टॉयलेटबाहेर येण्यापूर्वी भरपूर पाणी टाका. टॉयलेटमधून आल्यावर दुसऱ्याचा बिछाना-अंथरुणाला पाय पुसू नयेत.
४) रुममेट गावी गेल्यावर त्याचा शर्ट ऑफिस किंवा कॉलेजला घालून गेल्यास ५०० रुपये दंड असेल.
५) दारुपिऊन आल्यास गुपचूप झोपावे, बढाया मारु नयेत. झोपताना मोबाईल सायलेन्ट मोडवर ठेवा.
६) रुमच्या झाडूपासून, फिनाईल, हार्पिक, लाईट बील याची प्रत्येकाला पैशांची कॉन्ट्री येईल.
७) सर्वांनी एकच दिवशी कपड़े धुवायला काढू नयेत, २ दिवस आधी आपली वेळ सांगावी.
८) घाण वास असणारे शूज, चप्पल रुमच्या आत आणू नयेत, नाहीतर ते नंतर तपास यंत्राणांनाही सापडणार नाहीत.
९) कुणी अभ्यास करत असेल, तर काही थुक्रट राजकारण्यांसाठी वादविवाद घालू नये. येथे रिडर राहतात, लीडर नाही.
१०) रुमवर कुणीही नसताना गर्लफ्रेन्डला आणू नये, कारण नेहमी मनमोकळे बोलणारे, शेजारचे काका संध्याकाळी डोळे वटारुन पाहायला लागल्यावर कळते-समजते. अशामुळे बॅचलर्स मुलांचं नाव खराब होतं.
आवरता येणार नाही. एवढे एक से बढकर एक, खतरनाक मित्र असतात.