पुणे: पुण्यातील एका चिमुकलीनं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray) राजगडावरील रोपवेबद्दल (Rajgad Rope way) लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लहानग्या साईशानं (Saisha) आदित्य ठाकरेंना पत्र पाठवून राजगडावरील रोप वे बद्दल तक्रार केली आहे. एकविरा देवीच्या ‘रोप वे’पेक्षा राजगडावरील प्रस्तावित रोप वेला अधिक विरोध करण्यात येत आहे.आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एका छोट्या दुर्गप्रेमी चिमुकलीनं पत्र लिहिले आहे. या पत्रात साईशा धुमाळ हिनं आदित्य ठाकरेंकडे रोप पे प्रकल्प बांधू नका अशी विनंती केली आहे. (Pune based little girl wrote letter to Aaditya Thackeray for stop project of Rope Way on Rajgad fort)
सध्या राजगडावर रोपवे बांधण्याच्या सरकारच्या निर्णयावरून इतिहासप्रेमी संघटना आणि राज्य सरकार यांच्यात नवा वाद उफाळून आला आहे. इतिहास प्रेमी संघटनांनी राजगडावर बांधण्यात येणाऱ्या रोपवेला कडाडून विरोध दर्शविला आहे. मात्र, सरकारच्या याच निर्णयाला विरोध दर्शवितानाच पुण्यातील एका गडप्रेमी आणि ट्रेकर असलेल्या चिमुकलीने थेट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना पत्र लिहिले आहे.
साईशा धुमाळ हिनं या पत्राद्वारे पर्यावरणमंत्र्यांकडे राजगड किल्ल्यावर रोपवे बांधू नका, अशी मागणी केली आहे. पुण्यातील साईशा अभिजीत धुमाळ नावाच्या एका चिमुकलीने राजगडावरील रोपवेला विरोध दर्शविला आहे. रोप वेला विरोध दर्शविताना तिने आपली विरोधामागची भूमिका देखील मंत्री आदित्य ठाकरेंकडे स्पष्टपणे व्यक्त केली आहे.
राजगडावर रोपवे बांधू नका. कारण गडावर आणि आजूबाजूला फुलपाखरु, हरीण, मोर, ससे यांची घरं असतात. आपण गर्दी केली तर हे सगळे तिथून निघून जातील. त्यांना त्यांच्या घरामधून बाहेर काढू नका प्लीज. मला ट्रेकिंगला गेल्यावर त्यांना लपून पाहायला, फुलपाखरांच्या मागे धावायला आवडतं. आपण त्यांना आपल्या घरी राहू देत नाही. मग त्यांना त्यांच्या घरामधून बाहेर पाठवतो, असं साईशानं पत्रात लिहिलं आहे. साईशाचे वडिल अभिजित धुमाळ हे देखील ट्रेकर आहेत. साईशाची आई वर्षा धुमाळ आणि वडिल अभिजित धुमाळ यांनी साईशानं आदित्य ठाकरेंना पत्र पाठवल्याबद्दल तिचं कौतुक केलं आहे.
WTC Final सामन्यातील भारतीय गोलंदाजाच्या काही सुपरफास्ट डिलेव्हरीज, आयसीसीने शेअर केलेला ‘हा’ व्हिडीओ पाहाच#INDvsNZ #WTCFinal2021 #SouthamptonWeather https://t.co/ndFtkS7xiv
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 21, 2021
संबंधित बातम्या:
संभाजीराजे आणि अजित पवारांच्या बैठकीवर समाधानी नाही; मराठा आरक्षण संघर्ष समिती आंदोलनावर ठाम
(Pune based little girl wrote letter to Aaditya Thackeray for stop project of Rope Way on Rajgad fort)