पुणे : पुण्यातील (Pune) भोर (Bhor) तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर (Bhatghar) धरण क्षेत्रात अजूनही पाऊस झालेला नाही. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी ही झपाट्यानं कमी होऊ लागलीय. धरणातील पाणी साठ्यानं तळ गाठला आहे. सध्या धरणात केवळ 8 टक्केच पाणी साठा शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे. भोर, खंडाळा, बारामती, इंदापूर, फलटण, सोलापूर तालुक्यातील शेतीला आणि गावांना धरणातून पाणी पुरवठा होतो. गेल्या काही दिवसांपासून या भागातील शेतीला धरणातून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आल्यानं, धरणातील पाणीसाठा कमी झाल्याचं म्हटलं जात आहे. यंदा मान्सून वेळेच्या आगोदर दाखल होईल असा हवामान खात्यानं अंदाज व्यक्त केला होता. परंतु जून महिना अर्धा संपत आलातरी समाधानकारक असा पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे राज्यातील धरणांच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे.
भोर, खंडाळा, बारामती, इंदापूर, फलटण, सोलापूर तालुक्यातील शेतीला आणि गावांना धरणातून पाणी पुरवठा होतो. सध्या धरणात केवळ 8 टक्केच पाणी साठा शिल्लक आहे. यंदा कडक उन्हाळा असल्यामुळे धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला होता. धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे.त्यामुळे पाऊस वेळेवर दाखलं नाही झाला तर धरणावर अवलंबून असणाऱ्या गावांना पाणी टंचाईच्या संकटला सामोरं जाण्याची शक्यता आहे. भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण क्षेत्रात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही.
भाटघर धरणाची साठनं क्षमता 23.75 टीमसी एवढी आहे, वेळवंड नदीच्या पात्रावर हे धरणं बांधण्यात आल आहे. धरणाचं कामं 1927 मध्ये पूर्ण झाल होतं. भोर, खंडाळा, बारामती, इंदापूर, फलटण, सोलापूर तालुक्यातील शेतीला आणि गावांना धरणातून पाणी पुरवठा होतो. धरणावर असणाऱ्या वीज निर्मिती केंद्रात पाटबंधारे विभागाच्या इरिगेशन वॉटर बेसवर मधून वार्षिक 54.535 मिलियन युनिट वीज निर्मिती केली जाते. सध्या धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतीसाठी तालुक्यांना वीज निर्मिती केंद्रातून 2 हजार 165 क्युसेकने उन्हाळी आवर्तन सोडण्यात आलं होतं. त्यामुळं धरणातं केवळ 8 टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पाण्याची पातळी कमी झाल्यानं,पाण्याखाली गेलेली पांडव कालीन मंदिर दिसू लागली आहेत.
ही मंदिर पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत.