पुण्यातील खडकवासला धरणामधून पाण्याच विसर्ग सोडल्याने परत भिडे पूल पाण्याखाली गेलाय. पाटबंधारे खात्याकडून याबाबत सर्वांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे नदीपात्रातील गाड्या काढून घेण्याच्या सूचना पोलिसांनी नागरिकांना दिल्या होत्या. अशातच पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील पुना हॉस्पिटल येथील पुलावरून एक मुलगा पाण्यात पडला आहे. अग्निशामक दलाकडून शोधकार्य सुरू झालं असून दोन पथके रवाना झाली आहेत. व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे.
पाण्यात पडलेल्या मुलाचे वय अंदाजे 12 वर्ष असण्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाकडून दोन पथके रवाना करुन शोधकार्य सुरू आहे. खडकवासला धरणातून आज दिवसभरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीपात्रातल पाणी पातळी देखील वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने आणि पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा दिलाय.
पाहा व्हिडीओ:-
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात 7 हजार 704 क्यूसेक विसर्ग करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही साहित्य किंवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावीत, असं आवाहन मुठा कालवा पाटबंधारे उपविभागाकडून करण्यात आलं होतं.
पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने जे एम रोडवर वाहतुकीकोंडी झालेली आहे. दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहणांच्या रांगा लागल्या असून पुणेकर वाहतुकीकोंडीत अडकल्याने हैराण झालेत.