पुणे : तुमचे हात एवढे भष्टाचाराने बरबटले आहेत, की तुमचेच हात तुटतील आमचे तुटणार नाहीत, अशी टीका भाजपा प्रवक्ते विनायक आंबेकर (Vinayak Ambekar) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. कोणत्याही महिलेला हात लावाल, तर हात तोडून हातात देऊ, असा संताप सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) व्यक्त केला होता. त्यावर आंबेकरांनी टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना भाजपाकडून मारहाण झाली होती. त्यानंतर सुप्रिया सुळेंनी महिलांच्या सुरक्षेसंदर्भात गांभीर्याने विचार करत घडलेल्या घटनेचा निषेध केला होता. त्यावर भाजपाने पलटवार केला असून राष्ट्रवादीवरच टीकास्त्र सोडले आहे. विनायक आंबेकरांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडेंनी (Ankush Kakde) 25 कार्यकर्ते पाठवून मला मारहाण करायला लावली, असा आरोप त्यांनी केला आहे.
भाजपाचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी राष्ट्रवादीवर घणाघात केला. राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे समन्वयाचे राजकारण करत आहोत, असे दाखवतात, मात्र कार्यकर्ते पाठवतात, असा थेट आरोप त्यांनी केला आहे. शरद पवार, सुप्रिया सुळेंना जसा हक्क आहे, तसाच मलाही आहे. मी टॅक्स भरतो, असे प्रत्युत्तर विनायक आंबेकरांनी दिले आहे.
पुण्यात शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या भाजपा प्रवक्ते विनायक आंबेकर यांना शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. आंबेकर यांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.
काही वेळापूर्वी महाराष्ट्राची संस्कृती म्हणत होते @NCPspeaks नेते.
मग, ऑफिसमध्ये जाऊन मारहाण करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का?
सत्ता येते ,जाते.. सत्तेचा एवढा माज बरा नव्हे! pic.twitter.com/rJnrHjiKrT
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) May 14, 2022
याप्रकरणी पोस्ट केलेली कविता त्यांनी काढून टाकली होती, त्यात कोणत्याही नेत्याचे नाव नव्हते, तरीही या प्रकरणी माफी मागितली, असे स्पष्टीकरण आंबेकर यांनी दिले होते. आता त्यांनी अंकुश काकडे, सुप्रिया सुळेंना लक्ष्य केले. राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी बोलतात. मात्र त्याचे पालन करत नाहीत. सत्ता येते, जाते. मात्र हा माज बरा नव्हे, असे ट्विटही भाजपातर्फे करण्यात आले होते.