पुणे- आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या(Pune Municipal elections)तोंडावर शहरात राजकीय पक्षांच्या फोडफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. मागेही काही दिवसांपूर्वी भाजपच्या नगरसेविका शीतल सावंत यांचे पती अजय सावंत यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. महानगरपालिकेची प्रारूप आराखडा जाहीर झाल्यानंतर सावंत यांनी भाजपासोडून (BJP) राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्यानं राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता महापालिका निवडणुकीच्या पूर्वी कॉंग्रेसला(congress) खिंडार पाडले असून, महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचे पुतणे आणि समाजसेवक तुकाराम शिंदे यांचे नातू प्रणय शिंदे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदर चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रणय शिंदे यांचे पक्षात स्वागत केले असून , त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
मोदींचे काम जनतेपर्यंत पोहचवन्याचे काम करावे
पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींजीच्या कामामुळे आज प्रत्येकजण भारतीय जनता पक्षाशी जोडला जात आहे. त्यामुळेच भाजपा आज जगातील क्रमांक एकचा पक्ष झाला आहे. प्रणय शिंदे यांनी संघटन वाढीसह माननीय मोदीजींची कामे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी काम करावे. एखाद दुसऱ्या पक्षांतरामुळे भाजपाचे काहीही नुकसान होत नाही. उलट आगामी काळात शहरातील अनेक दिग्गज भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे संघटन मजबूत होण्यास अजून मदतच होणार आहे.
मोदींच्या कामामुळे प्रभावित होऊन पक्षप्रवेश
भारतीय जनता पक्षाचे विचार आणि माननीय नरेंद्र मोदीजींचे कामामुळे प्रभावित होऊन आज पक्षात प्रवेश करत आहे. भविष्यात पक्षाचे संघटन वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार. दरम्यान, प्रणय शिंदे यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना भाजपा युवा मोर्चा पुणे शहरच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्याची घोषणा युवा मोर्चा शहर अध्यक्ष राघवेंद्र (बापू) मानकर यांनी केली. यावेळी महापौर मुरलीधर आण्णा मोहोळ, भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे मनपा गटनेते गणेश बिडकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र (बापू) मानकर, भाजपा पुणे शहर सरचिटणीस दीपक पोटे, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, युवा मोर्चा सरचिटणीस अभिजीत राऊत आदी उपस्थित होते.
Nitesh Rane: नितेश राणेंच्या छातीतील दुखणे वाढले, तातडीने कोल्हापूरकडे रवाना