पुणे : राज्यात कोरोनाचा (corona) कहर पुन्हा एकदा जाणवू लागला असून पुण्यातही कोरोनाचे रुग्ण (Pune corona update) लक्षणीयरित्या वाढत आहेत. मागील काही दिवसांपासून रुग्णवाढीचा आलेख वर जात आहे. आज दिवसभरात कोरोनाचे 328 नवे रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे सध्या जेवढे रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत, त्यापेक्षा जास्त रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे येथील प्रशासन धास्तावले असून पुणेकरांची चिंता वाढल्याचे म्हटले जात आहे. (Pune corona update current corona pandemic status)
पुण्यात आज दिवसभरात कोरोनाचे 328 नवे रुग्ण आढळले. तर दिवसभरात येथे 318 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. येथे उपचारादरम्यान तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला असून यापैकी 7 रुग्ण हे पुणे शहराबाहेरील आहेत. पुण्यात सध्या 172 कोरोना रुग्ण गंभीर असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार पुण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 1 लाख 98 हजार 292 वर पोहोचला आहे. पुण्यात सध्या 2902 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत पुण्यात 4830 जणांचा मृत्यू झाला आहे.
पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे येथे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपायोजना केल्या जात आहेत. कोरोना हॉटस्पॉट म्हणजू जाहीर केलेल्या भागात प्रशासनातर्फे प्रभावी नियोजन करण्यात आले आहे. तसेच, आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे सुपर स्प्रेडर, तसेच SARI रुग्णांचे सर्वेक्षण केले जात आहे. खासगी रुग्णालयांमध्ये फ्लू सदृश रुग्णांची RTPCR चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अधिक प्रभावीपणे राबवण्याचे धोरणही येथील प्रशासनाने आखले आहे.
दरम्यान असे असले तरी, पुणे शहर तसेच ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. चेहऱ्याला मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिग पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे, असे नियम नागरिकांनी पाळावेत असेही येथील प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
‘त्या’ शाळांची शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करणार- वर्षा गायकवाड https://t.co/3wOYZ6AXpi @VarshaEGaikwad @CMOMaharashtra @OfficeofUT #SchoolFee #Coronaperiod #VarshaGaikwad
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 22, 2021
इतर बातम्या :