पुण्यात आज रात्रीपासून उद्या दिवसभर पाणीपुरवठा बंद; नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळणार

| Updated on: Sep 14, 2022 | 9:07 AM

ऐन पावसाळ्यात पाणी समस्या आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दोन दिवस पाणी समस्या येणार असल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन पुणे महानगरपालिकेने केले आहे.

पुण्यात आज रात्रीपासून उद्या दिवसभर पाणीपुरवठा बंद; नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळणार
Follow us on

राज्यात सर्वत्र पावसाने थैमान घातले असतानाच पुण्यात मात्र आज रात्रीपासून उद्या दिवसभर पाणीपुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याची समस्या उद्बवणार आहे. आज रात्रीापासून बंद होणारे पाणी उद्या दिवसभरही पुरवठा बंदच राहणार असल्याचे पुणे महानगरपालिकेकडून सांगण्यात आले आहे. ऐन पावसाळ्यात पाणी समस्या आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दोन दिवस पाणी समस्या येणार असल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन पुणे महानगरपालिकेने केले आहे.