Pune crime : बायको अन् दोन मुलांना बोलावून पीएमपी चालक, वाहकासह तिघांना मारहाण, शंकरशेठ रस्त्यावरचा प्रकार

| Updated on: Sep 05, 2022 | 11:25 AM

बस आळंदीहून स्वारगेटला जात असताना उड्डाणपुलाजवळ वाहतूक कोंडीत अडकली होती. बस चालक लक्ष्मण धुमाळ यांनी इग्निशन बंद केले तसेच वाहतूककोंडी कमी होण्याची मोकळा होण्याची ते वाट पाहत होते. त्यावेळी हा प्रकार घडला.

Pune crime : बायको अन् दोन मुलांना बोलावून पीएमपी चालक, वाहकासह तिघांना मारहाण, शंकरशेठ रस्त्यावरचा प्रकार
मृत्यूनंतर 18 महिने केले नाही अंत्यसंस्कार
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : वाहतूककोंडीत (Traffic jam) अडकलेल्या एका रहिवाशाने पीएमपीएमएलच्या चालकाशी वाद घालून त्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. शंकरशेठ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी कारला डावीकडे वळण घेता येत नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या वाहनचालकाने पत्नी तसेच आपल्या दोन मुलांना घटनास्थळी बोलावून पीएमपीएमएल (PMPML) चालक, वाहक आणि पीएमपी ट्रान्सपोर्ट बॉडीच्या सुपरवायझर अशा तिघांना मारहाण केली आहे. खडक पोलिसांनी संबंधित व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबीयांवर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल आणि सार्वजनिक सेवकाला दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा (Filed a case) दाखल केला आहे. सायंकाळी 7.30च्या सुमारास सेव्हन लव्हज फ्लायओव्हरजवळ हा प्रकार घडला. पोलिसांनी सांगितले, की बस आळंदीहून स्वारगेटला जात असताना उड्डाणपुलाजवळ वाहतूक कोंडीत अडकली होती. बस चालक लक्ष्मण धुमाळ यांनी इग्निशन बंद केले तसेच वाहतूककोंडी कमी होण्याची मोकळा होण्याची ते वाट पाहत होते.

कुटुंबीयांना बोलावले

यावेळी कारमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीला मीरा सोसायटीतील त्याच्या मुलाच्या गॅरेजकडे जाणाऱ्या लेनमध्ये डावीकडे वळण घ्यायचे होते, परंतु बस त्याच्या समोर असल्याने त्याला तसे करता आले नाही. त्या माणसाने काही वेळ हॉर्न वाजवला. मात्र वाहतूककोंडीमुळे काहीच करता आले नाही. त्यामुळे त्या व्यक्तीने कुटुंबीयांना गॅरेजमधून घटनास्थळी बोलावून घेतले. तत्पूर्वी पीएमपी चालकाशी वादही घातला, असे असे सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक यांनी सांगितले.

चालकाला दुखापत

ते पुढे म्हणाले, की बस पुढे जाण्यास काहीच संधी नव्हती, असे चालक धुमाळ यांनी त्यास सांगितले. मात्र तरीही ती व्यक्ती वाद घालतच राहिली. त्याने आपल्या दोन मुलांना तसेच पत्नीला बोलावले आणि मारहाण केली. यावेळी पीएमपीएमएल गॅरेज पर्यवेक्षक वाबळे यांनी मध्यस्थी केली तसेच बसमधील प्रवाशांनीदेखील तसे करू नका, असे सांगितल्यानंतरही त्यांनी मारहाण सुरूच ठेवली. दरम्यान, धुमाळ यांना यात दुखापत झाली आणि पोटातही तीव्र वेदना होत असल्याची तक्रार त्यांनी केली, असे नाईक यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल

पीएमपीएमएल कर्मचार्‍यांनी कारचा नंबर नोंदवला आणि पोलिसांना कॉल केला. आम्ही कुटुंबातील सदस्यांची ओळख पटवली आहे. त्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी 353 (सरकारी कर्मचाऱ्याला त्याची कर्तव्ये पार पाडण्यात अडथळा आणणे), 332 (सरकारी कर्मचाऱ्याला दुखापत करणे), 504 (हेतूपूर्वक अपमान करणे), 506 (गुन्हेगारी, धमकावणे), कलम 34 या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.