Pune Darshana Pawar Case : ‘मला आई-वडिलांनी कधीच सांगितलं नाही की…’; MPSC पास दर्शना पवारचा शेवटचा व्हिडीओ समोर!

| Updated on: Jun 21, 2023 | 7:32 PM

darshana Pawar Last Speech video: दर्शनासोबत गडावर गेलेला मित्र येताना एकटाच आला आणि आता तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अशातच सोशल मीडियावर दर्शना पवारचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये दर्शना पवार भाषण करताना दिसत आहे.

Pune Darshana Pawar Case : मला आई-वडिलांनी कधीच सांगितलं नाही की...; MPSC पास दर्शना पवारचा शेवटचा व्हिडीओ समोर!
Follow us on

मुंबई : एमपीएससी परीक्षेमध्ये पास झालेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील दर्शना पवार हिचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी सतीचा माळ परिसरात आढळला होता. दर्शना पवार हिचा खून झाल्याची माहिती तिच्या शवविच्छेदन अहवालावरून समोर आली आहे. दर्शनासोबत गडावर गेलेला मित्र येताना एकटाच आला आणि आता तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अशातच सोशल मीडियावर दर्शना पवारचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये दर्शना पवार भाषण करताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

 

शेवटच्या भाषणामध्ये काय म्हणाली दर्शना पवार?

प्रत्येकाच्या लाईफची एक स्टोरी आहे. ती स्टोरी ऐकण्यासाठी लोकं तेव्हाच इतके उत्सुक असतात जेव्हा ती स्टोरी आपल्याकडे सक्सेस स्टोरी बनून येतेय. आपण स्कूल, कॉलेजमध्ये चांगला परफॉर्मन्स करतो पण आज एवढा सत्कार होतोय इतके लोकं आपल्याशी बोलताय, ते आपल्या मुलींना घेऊन येतात. विचारतात की सांग कसा अभ्यास केला पाहिजे. ती गोष्टी साध्य केलेली असते ना, त्यात खूप लोकांचा हात असतो.

जेव्हा आपण अपयशी ठरतो ना, ते आपले दोष असतात की, आपण अभ्यास कमी केला असेल, आपण डायव्हर्ट झालो असेल. पण जेव्हा आपण यशस्वी होतो ना, तेव्हा त्यामागे खूप लोकांची मेहनत असते. माझ्या घरामध्ये मला आई-वडिलांनी कधीच सांगितलं नाही की, तू हे नाही करु शकत. त्यांना खूप आत्मविश्वास आहे. त्यात त्यांचा महत्वाचा रोल आहे. ते नेहमी मला पुश करत असतात. त्यामुळे मी सर्व माझ्या कुटुंबाचे, माझ्या मित्र, मैत्रणींचे खूप खूप आभार मानते. या अॅकडमीचे जास्त स्पेशल आभार मानते, त्यांनी त्यावेळेला मला कॉन्फिडेंट केलं होतं जेव्हा मला वाटलं होतं की आता घरी जायची वेळ आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

12 जूनला दर्शना पवार तिचा मित्र  राहुल हांडोरे  याच्यासह ती राजगडला ट्रेकसाठी गेले होते. राजगडावरून माघारी येताना दर्शना परतलीच नाही. मात्र राहुल तिथून एकटाच त्याच्या बाईकवरून गेलेला होता. दर्शनाचा संपर्क होत नसल्याने तिच्या वडिलांनी  सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. पाच दिवसानंतर तिचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी मिळाला. यादरम्यान राहुलसुद्ध फरार असल्याने तो बेपत्ता असल्याची तक्रार वारजे पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली होती.

दरम्यान, आता दर्शनाचा खून असल्याचं समोर आलं आहे. मात्र तिला नेमकं कोणी आणि का संपवलं? आता मिळालेल्या सीसीटीव्हीच्या आधारावर तरी राहुला हाच संशयित आरोपी वाटत आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून खूनाचं कारण काही दिवसात समोर येईल.