बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी महाविकास आघाडीची सभा होत आहे. या सभेला बाळासाहेब थोरात, भास्कर जाधव, राजेश टोपे, रोहित पवार, भूषणसिंह होळकर उपस्थित आहेत. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी या सभेत भाषण केलं. यावेळी त्यांनी शेरोशायकी केल्याचं पाहायला मिळालं. “कुणी चोरली झाडे… कुणी पाहिली घडी? कोणी दाखवली ED पण जनतेच्या मनात फक्त महाविकास आघाडी”, असं राजेश टोपे म्हणाले.
मी जालन्यातून मुद्दाम प्रचारासाठी आलो आहोत. आम्ही जो एक्ससिट पोल घेतला आहे. त्यावरून विदर्भ आणि मराठववाड्यात एक दोन सीट्स सोडल्या. तर सगळीकडे महाविकास अघडीचे उमेदवार निवडून येतील. सुप्रियाताईंनी आपला पक्ष वाढवण्यासाठी गल्लीत प्रचार केला. पक्ष वाढवला. मी भाऊ म्हणून तुम्हाला विंनती करतो की, परत निवडून द्या. त्या केवळ खासदार म्हणून राहिल्या आहेत. ताईंचं कर्तृत्व मोठं आहे. तुम्हाला आम्हाला ताईचा सार्थ अभिमान असला पाहिजे. म्हणून आपण ताईला निवडून दिले पाहिजे, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.
कोरोना काळात राज्याची सेवा शरद पवारसाहेबांनी केली. पवारसाहेब घराबाहेर पडून राज्यात फिरत होते. काम करत होते. माझं खूप कौतुक सुप्रियाताईंनी केलं. जर मानलेल्या भावंचं कौतुक त्या एवढं करत असतील, तर आपल्या भावाचं त्यांना किती कौतुक असेल?, असं म्हणत राजेश टोपे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर भाष्य केलं.
आपली बाजू नैतिक आहे. धर्माला धरून आहे. लोकशाही धोक्यात आली आहे. आपलं स्वतंत्र धोक्यात आली आहे. लोकांना जेलमध्ये टाकलं जात आहे. नरेंद्र मोदींची गॅरंटी… आता विश्वास ठेवायला काहीच उरलं नाही. सगळी आश्वासन फोल ठरली आहेत. महागाई बेरोजगारि काहीच कमी झाली नाही. नरेंद्र मोदींनी शरद पवारसाहेबांना भटकती आत्मा म्हटलं. हे दौंडकर सहन करणार का?, असा सवाल राजेश
टोपे यांनी विचारला.