पुण्यात हॉटेलच्या वॉशरूममध्ये 2 तरूणींचा ड्रग्जचं सेवन करतानाचा व्हिडीओ समोर, पाहा Video

| Updated on: Jun 24, 2024 | 6:34 PM

Pune Dugs Video : पुण्यातील ड्रग्ज प्रकरण चर्चेत असताना अशताच आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरूणी एका हॉटेलच्या वॉशरूममध्ये असल्याचं दिसत आहेत. या व्हिडीओमुळे पु्ण्यामध्ये ड्रग्जचंही जाळं पसरल्याचं आता समोर येत आहे.

Follow us on

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलं ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ समोर आला होता. हे प्रकरण चर्चेत असताना अशातच आणखी एक व्हिडीओ समोर आलाय. यामध्ये दोन तरूणी एका हॉटेलच्या वॉशरूममध्ये ड्रग्जचं सेवन करत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पुण्यातील पुणे नगर रस्त्यावरील हॉटेल मधील असल्याचा दावा करण्यात येत आहे. पुण्यातील ड्रग्जचं जाळं वाढत मोठ्या प्रमाणात पसरल्याचं हे या व्हिडीओवरून दिसत आहे पोलीस या व्हिडीओचा तपास करत आहेत.

पुण्यात हॉटेलच्या वॉशरूममध्ये 2 तरूणींचा ड्रग्जचं सेवन करतानाचा व्हिडीओ समोर#pune #drug #DrugsFreeBharat pic.twitter.com/kyf8ceS6uF

— Harish Malusare (@harish_malusare) June 24, 2024

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखलं जाणाऱ्या पुण्याची ओळख आता बदलत चालली आहे. गुन्हेगारीच्या वाढत्या घटना त्यानंतर ड्रग्जच्या जाळ्यातही पुण्याची तरूणाई अडकल्याचं दिसत आहे. पुण्यातील नामांकित हॉटेलमधील अल्पवयीन मुलांचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ समोर आला होता. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेत आठ जणांना ताब्यात घेतलं आहे.

आरोपींवर अद्याप अमलीपदार्थ प्रतिबंधक कायदायतील कलमांनुसार कारवाई केलेली नाही. ⁠तपास सुरु आहे. व्हीडीओ L3 मधीलच आहे का? कधीचा आहे? अंमलीपदार्थाचा वापर झाला आहे का? हे तपासात समोर येईल. त्यानंतर आरोपींविरोधातील कलमांमध्ये वाढ करण्यात येईल. व्हायरल झालेल्या सर्व व्हिडीओची तपासणी सुरु आहे. हीडीओ मध्ये दिसणार्या सर्वांची ओळख पटवण्याचे काम सुरु असल्याची माहिती पुणे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांनी दिली.

दरम्यान, पुण्यातील या ड्रग्ज प्रकरणावरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी यावरून थेट राज्य शुल्क उत्पादन मंत्री शंभुराज देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता हा नवीन समोर आलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे हे पोलीस तपासामध्ये समोर येईल.