पुणे गेल्या काही दिवसांपासून कायम चर्चेत असलेलं पाहायला मिळत आहे. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये गुन्हेगारी, ड्रग्ज, हिट अंँड रनसारख्या घटना होत आहेत. व्यवस्थेला भ्रष्टाचाराची कीड लागलीय हे पोर्शे काप अपघात प्रकरणामध्ये दिसून आलं. त्यानंतर एफसी रोडवर ड्रग्ज घेताना तरूणाचा व्हिडीओ समोर आला होता. पोलीस व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच पिंपरी चिंचवड शहरामध्ये जाधववाडी वडाचा मळा या परिसरातून प्रेम संबंधातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
अब्दुलकमाल याचे संशयित आरोपी विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. अब्दुलकमाल हा आपल्या प्रेयसीला म्हणजेच विवाहित महिलेला पती आणि मुलांना सोडून माझ्याकडे राहायला ये, असं बोलत होता. या गोष्टीवरून दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. रोज- रोज दोघांमध्ये भांडणे होऊ लागलीत, शेवटी विवाहित महिलेने आपल्या मित्राला या प्रकरणाबाबत सर्व काही सांगितलं.
प्रेमदास चव्हाण आणि विवाहिते महिलेने अब्दुकमाल याला मारहाण करत मारण्याचा प्रयत्न केला. दोघे मारत होते त्यावेळी तिथे उपस्थित असलेले फिर्यादी हबीब शेख. रमजान अली आणि हिरामण रोकडे यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी प्रेमदास चव्हाण आणि महिलेने तुम्ही मध्ये आलात तर तुम्हाला पण मारून टाकील, अशी धमकी दिली. अब्दुकमाल गंभीर जखमी झालाय, दोघांना मारहाण करतानाचे दृश्य नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलेत.
दरम्यान, या प्रकरणी चिखली पोलिसांत प्रेयसी आणि तिचा मित्र आरोपी प्रेमदास चव्हाण यांच्या विरोधात भा. न्या. सं .१०९, ११५ (२) , ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही चिखली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.