पुण्यात हॉटेलच्या इमारतीला भीषण आग, फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल, कुठे घडली घटना?

| Updated on: Nov 01, 2022 | 9:25 AM

पुण्यात मंगळवारी पहाटेच इमारतीला आग लागल्याची दुर्घटना समोर आली आहे.

पुण्यात हॉटेलच्या इमारतीला भीषण आग, फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल, कुठे घडली घटना?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

योगेश बोरसे, पुणेः पुण्यातील (Pune) कोंढवा परिसरात एका बिल्डिंगला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. कोंढव्यातील लुल्लानगर चौक परिसरातील ही घटना आहे. मंगळवारी सकाळीच या इमारतीच्या वरच्या भागातील मजल्यांवरून आधी धुर निघाल्याचं प्रत्यक्ष दर्शींना दिसलं. त्यानंतर याच ठिकाणाहून मोठ-मोठे आगीचे लोळ उठताना दिसले.

पाहा आगीची दृश्य-

कोंढवा येथील लुल्लानगर चौक मार्वल विस्टा बिल्डिंग(पीएनजी ब्रदर्स) येथे आगीची घटना घडली आहे. आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडची वाहनंदेखील पोहोचली आहे. 2 टँकरदेखील आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

हॉटेलच्या इमारतीत सातव्या मजल्यावर ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आगीत हॉटेलचं मोठं नुकसान झालंय. मात्र घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

या आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. अद्याप अधिकृत माहिती प्रशासनानतर्फे देण्यात आलेली नाही.

सकाळी कामावर जाणाऱ्या लोकांना सर्वप्रथम या आगीची दृश्य दिसली. थोडा वेळ धूर आला त्यानंतर सातव्या मजल्यावर मोठ्या प्रमाणावर आगीचे लोळ येताना दिसले, असे प्रत्यक्षदर्शीनी टीव्ही9 शी बोलताना सांगितलं.

आग लागताच अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी तत्काळ दाखल झाल्या. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न वेगाने सुरु आहेत.