Pune Crime : पुणे हादरलं, अल्पवयीन तरुणाकडून गोळीबार, काय कारण?

| Updated on: Jun 22, 2024 | 8:55 PM

Pune Firing Case : पुण्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील धायरी भागात अल्पवयीन तरूणांनी गोळीबार केला आहे.

Pune Crime : पुणे हादरलं, अल्पवयीन तरुणाकडून गोळीबार, काय कारण?
Follow us on

विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जाणाऱ्या पुणे शहराची ओळख आता बदलत चालली आहे. दिवेसेंदिवस पुणे शहरामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं दिसत आहे. अशातच पुण्यामध्ये परत एकदा गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यामध्ये झालेला हा गोळीबार अल्पवयीन तरूणांकडून झाल्याची माहिती समजत आहे. या घटनेमुळे धायरी भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

पुण्यामधील धायरी भागात हा गोळीबार झाला असून अल्पवयीन तरुणाने दुसऱ्या अल्पवयीन तरुणावर झाडल्या गोळ्या झाडल्या आहेत. जुन्या भांडणाच्या रागातून हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती समजत आहे. या गोळीबारामध्ये सुदैवाने अल्पवयीन तरूणाला एकही गोळी लागली नाही. ज्या ठिकाणी हा गोळीबार झाला  पोलीस दाखल झाले आहेत.

पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. आताच पुणे पोर्षे कार अपघात प्रकरणामुळे पुणे चर्चेत होतं. त्याआधी कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. टोळीयुद्धाा भडका उडू नये म्हणून पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व गुंडांना ओळख परेड करण्यासाठी बोलावून घेतलं होतं.

दरम्यान, या पोलीस परेडवेळी नामचीन गुंड पाहायला मिळाले होते. यामध्ये गजा मारणे, बोडके ते निलेश घायवळ असे अनेक कुख्यात गुंडांना आयुक्तांनी दम भरला होता. मात्र काही दिवसांनी परत आता खुलेआम गोळीबार होण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत.