पुणे : डेक्कन परिसरातील सेंट्रल मॉल परिसरात गॅस गळतीच्या भीतीने एकच खळबळ उडाली होती. दुपारी 12 वाजता गरवारे कॉलेजजवळ असलेल्या सेंट्रल मॉलमध्ये केमिकलचा उग्र वास येत होता. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत होता. याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाचे अधिकारी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान, मॉलच्या पार्किंगमध्ये केमिकल पावडर आढळल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.(Gas leak in Central Mall in Deccan area of Pune)
अग्निशमन दलाच्य जवानांनी पाहणी केली असता मॉलच्या पार्किंगमध्ये केमिकल पावडर आढळून आली आहे. या केमिकल पावडरमुळे गॅस निर्माण झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पार्किंगमधील ती पावडर बाहेर काढून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आली आहे. आता मॉलमध्ये ही पावडर कुठून आली याचा तपास केला जात आहे. एनसीएलचे अधिकारी हा तपास करणार आहेत. गॅस गळतीची शक्यता लक्षात घेता मॉल रिकामा करण्यात आला होता. त्यानंतर एरंडवणा अग्निशमन दलाच्य जवानांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत पुढील धोका टाळला.
Maharashtra: A minor chemical leak reported in Central Mall parking near Garware College in Pune today. 2 fire tenders were rushed to spot & mall was evacuated. A bag containing 2 chemicals was found. The situation was later brought under control & mall was reopened. Probe is on. pic.twitter.com/EFY8Q1alDj
— ANI (@ANI) March 29, 2021
पुण्यातील कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट मार्केटला शुक्रवारी मध्यराक्षी भीषण आग लागली होती. तब्बल 800 दुकानं या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. तब्बल 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आलं. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यात फॅशन स्ट्रीट मार्केटमधील तब्बल 800 दुकानं आगीच्या कचाट्यात सापडली. तसेच या आगीमुळे व्यापारांचे करोडो रुपयांचे नुकसान झालं आहे.
Maharashtra: Fire breaks out at Fashion Street market in Camp area of Pune. Fire tenders rushed to the spot. More details awaited. pic.twitter.com/EMepVu2TdE
— ANI (@ANI) March 26, 2021
इतर बातम्या :
दुकानं बंद करण्यासाठी 1 तासांचा वेळ वाढवून द्या, पुणे व्यापारी असोसिएशनची मागणी
Gas leak in Central Mall in Deccan area of Pune