Pune rape case : स्वारगेट बलात्कार पीडितेचा आवाज बाहेर का ऐकू आला नाही? पोलिसांना मिळाला सर्वात मोठा पुरावा

| Updated on: Mar 21, 2025 | 5:43 PM

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या एका बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Pune rape case : स्वारगेट बलात्कार पीडितेचा आवाज बाहेर का ऐकू आला नाही? पोलिसांना मिळाला सर्वात मोठा पुरावा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

काही दिवसांपूर्वी पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली होती, पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या एका बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली होती. दत्ता गाडे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. त्याने स्वारगेटमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये पीडितेवर बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्याला त्याच्याच गावातून पोलिसांनी अटक केली, सध्या तो कोठडीमध्ये आहे. दरम्यान या प्रकरणात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जेव्हा घटना घडली तेव्हा पीडितेनं आरडा-ओरड केली, मात्र तिचा आवाज कसा ऐकू आला नाही? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. याबाबत आता मोठा खुलासा समोर आला आहे.

या प्रकरणात पोलिसांकडून ज्या बसमध्ये ही घटना घडली होती तिची शास्त्रोक्त तपासणी करण्यात आली आहे. ज्या बसमध्ये ही घटना घडली त्या बसमधून आवाज बाहेर येतो की नाही याची शास्त्रोक्त पडताळणी पोलिसांनी केली. यातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे.  अत्याचारावेळी तरुणीने आरोपीला प्रतिकार केला. मोठ्याने आरडाओरडा करून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केला, मात्र बस वातानुकूलित असल्याने काचा बंद होत्या,  त्यामुळे आवाज बाहेर ऐकू आला नाही. असं पोलीस तपासात समोर आलं आहे. आरोपीविरोधात भक्कम पुरावे जमा करण्यासाठी पोलिसांकडून या बसची पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

काही दिवसांपूर्वी पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या एका बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती. बसमध्ये आरोपीने तरुणीवर बलात्कार केला. दत्ता गाडे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव असून, तो पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील गुणा गावचा रहिवाशी आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. तो त्याच्या मुळगावी लपून बसल्याचा पोलिसांना सशंय होता. पोलिसांनी त्याला त्याच्याच गावातून अटक केली. पीडितेवर दोनदा अत्याचार झाल्याचं मेडिकल रिपोर्टमधून समोर आलं आहे.  सध्या या प्रकरणातील आरोपी कोठडीत आहे.