पुणे : तडीपार गुंडाने हातात कोयता घेऊन डान्स केल्याचा प्रकार पुण्यात शिवजयंतीला घडल्याचं उघडकीस आलं आहे. गुंड रोशन लोखंडे याने दहशत निर्माण केल्याचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे रोशनसोबत नाचणाऱ्या एका गुंडाच्या हातात पिस्तुलही दिसत आहे. (Pune Goon Roshan Lokhande Dance with Weapons goes viral Social Media)
सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील पिराजी नगर परिसरात शिवजयंतीच्या दिवशी हा प्रकार घडल्याची माहिती आहे. तडीपार गुंडाने हातात कोयता घेऊन नाचत दहशत निर्माण केल्याचा व्हिडिओ पाहिल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. रोशन लोखंडे याच्याविरुद्ध शस्त्र जवळ बाळगणे, दरोडा अशा प्रकारचे गंभीर गुन्हे याआधी दाखल आहेत. त्याला याआधीही तडीपार केले होते. आता रोशनला तडीपार करण्याची ही दुसरी वेळ आहे.
गुंडाच्या साथीदाराच्या हातात पिस्तुल
डान्स करणाऱ्या ग्रुपमधे आणखी एका तरुणाच्या हातात पिस्तुल असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. गुंडांनीच हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकल्याने हे प्रकरण उजेडात आले. याबाबत सिंहगड रस्ता पोलिसांकडून अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.
नागरिकांमध्ये भीती आणि संताप
या व्हिडीओमुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तडीपार असणारे गुन्हेगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरत असल्याचे माहित असूनही पोलीस दुर्लक्ष करत असल्याने नागरिकात संतापाची लाट आहे. पूर्वी तडिपारीच्या नावाने गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण होत असे. अशा गुन्हेगारांना समाजदेखील आपल्या दैनंदिन व्यवहारापासून चार हात लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होता.
पाहा व्हिडीओ :
पुण्यात गुंडांचा हैदोस सुरुच
कुख्यात गुंड शरद मोहोळ अवघ्या 15 दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आला होता. कातिल सिद्दिकीच्या हत्या प्रकरणातून त्याची मुक्तता झाली. मात्र 26 जानेवारील शरद मोहोळने हजेरी लावलेल्या कार्यक्रमात धांगडधिंगा केल्याप्रकरणी पुण्यातील खडक पोलिसांनी मोहोळला बेड्या ठोकल्या. (Pune Goon Roshan Lokhande Dance with Weapons goes viral Social Media)
तीनशे ते पाचशे चारचाकी गाड्या घेऊन काढली मिरवणूक
दुसरीकडे, मारणे टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड गजा ऊर्फ गजानन मारणेची तळोजा कारागृहातून मुक्तता झाली. त्यानंतर त्याची पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जवळपास तीनशे ते पाचशे चारचाकी गाड्या घेऊन ही मिरवणूक निघाली. यावेळी मारणेचे साथीदार द्रुतगती महामार्गावर थांबून आरडाओरडा करुन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होते. या धांगडधिंगा प्रकरणात पोलिसांनी गजा मारणेला अटक केली आहे.
संबंधित बातम्या :
धांगडधिंगा भोवला! कुख्यात गुंड गजा मारणेला पोलिसांकडून अटक
15 दिवसांपूर्वी तुरुंगाबाहेर, पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळला पुन्हा अटक
(Pune Goon Roshan Lokhande Dance with Weapons goes viral Social Media)