पुणे : घरफोड्या तसेच वाहनचोरी करणाऱ्यांच्या मुसक्या इंदापूर पोलिसांनी (Indapur Police) आवळल्या आहेत. इंदापूर शहरातील श्रीराम हाऊसिंग सोसायटी येथील घर फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरी केले होते. तसेच नाझरकर यांच्या मालकीची सियाज कंपनीची गाडी चोरट्यांनी चोरून (Stole) नेली होती. इंदापूर शहरातील व परिसरातील अनेक घरफोड्या व मोटरसायकली चोरून नेल्या होत्या. त्याचे सदरील गुन्हे नोंद होते. सदर गुन्ह्यातील आरोपींना इंदापूर पोलिसांनी पकडले असून आरोपींकडे (Accused) चौकशी केली असता जवळपास 7 गुन्हे उघडकीस आले. त्यामध्ये 15 मोटरसायकल, एक मारुती सियाज कार, सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम अशी एकूण 18 लाख 6 हजार रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
इंदापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने उल्हास नगर तसेच मुंबई भागात जावून 23 मे रोजी रितेश जितेंद्र विटकर (रा.वडारगल्ली इंदापूर), सागर रमेश कोष्टे (रा. साकी विहार रोड, मुंबई) यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून चोरीला गेलेली कारही जप्त केली. आरोपींना अटक करून त्यांची पोलीस कोठडी घेवून पुढे तपास केला असता गणेश महादेव चौगुले व राहुल बाळासाहेब पवार दोन्ही (रा. वडारगल्ली, इंदापूर) यांची नावे निष्पन्न झाल्याने त्यांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एकूण 15 मोटार सायकल, 1 मारुती सियाज कार तसेच सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 18 लाख 6 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
#Pune : घरफोड्या, वाहनचोरी करणाऱ्यांच्या मुसक्या इंदापूर पोलिसांनी आवळल्या आहेत. याविषयी माहिती दिलीय पोलीस निरीक्षक तयुब मुजावर यांनी…#crime #Pune #arrested @puneruralpolice
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmGZMLmk pic.twitter.com/RujYD4IMnQ— TV9 Marathi (@TV9Marathi) May 29, 2022
आपल्या गावामध्ये, शहरामध्ये तसेच दुकानाच्या शेजारी आंब्याच्या किंवा इतर कोणत्याही व्यवसायासाठी येत असेल तर त्वरीत पोलिसांना कळवावे. ज्यांची वाहने चोरी झाली आहेत, त्यांनी कागदपत्रे आणून आपल्या ताब्यात घ्यावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्यासोबतच अशा अनेक गाड्या चोरट्यांनी विकल्या आहेत. त्याविषयी काही माहिती असल्यास पोलिसांना कळवावी, त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी तपास सुरू असून आतापर्यंत चारजणांना अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामती अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदशनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली.