पृथ्वीराज चव्हाण-थोरातांसमोरच काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उघड; ‘या’ नेत्याच्या हकालपट्टीची मागणी

| Updated on: Apr 21, 2024 | 6:48 PM

Pune Internal factionalism in Congress exposed in front of Prithviraj Chavan Balasaheb Thorat : काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. पुण्यातील त्या नेत्याच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली आहे. पृथ्वीराज चव्हाण-बाळासाहेब थोरातांसमोर घडला हा प्रकार...

पृथ्वीराज चव्हाण-थोरातांसमोरच काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उघड; या नेत्याच्या हकालपट्टीची मागणी
Follow us on

लोकसभा निवडणुकीचं वारं देशभर वाहतं आहे. अशात देशातील प्रमुख विरोधी पक्ष असणारा काँग्रेसही ताकदीने या निवडणुकीत उतरला आहे. अशातच काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. पुणे काँग्रेसमधील धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यासमोरच शहर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांकडून पुण्यातील काँग्रेसभवनमध्ये बॅनर्सबाजी करण्यात आली. आबा बागुल यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. पुण्यातील काँग्रेसच्या कार्यालयात हा सगळा प्रकार घडला आहे.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेस भवन परिसरात बॅनरबाजी करण्यात आली. भाजपच्या नेत्यांची नागपूरमध्ये भेट घेऊन येणाऱ्याचा जाहीर निषेध असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे.’ गद्दार भगाओ, काँग्रेस बचाओ’ असा उल्लेख बॅनर्सवर करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

काही वेळा आधी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात पत्रकार परिषद या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस आणि इंडिया आघाडीला देशात चांगलं यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसचे दोन पदाधिकारी काँग्रेसभवनमध्ये बॅनर्स घेऊन आले. त्यांनी आबा बागुल यांच्या हकालपट्टी मागणी केली. यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे देखील तिथे उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. नरेंद्र मोदींनी 2 कोटी तरुणांना रोजगार देणार असं आश्वसन दिले होते. मात्र हे फक्त निवडणुकीपुरतेच आश्वासन देण्यात आले होते. इंडिया आघाडीचे सरकार येईल तेव्हा ज्यांनी परदेशात काळे लपवले आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. मोदी सरकारकडे यासंदर्भात सर्व कागदपत्रे असताना कारवाई केली नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 2014 मध्ये दिलेली आश्वासनं नरेंद्र मोदींनी का पूर्ण केली नाहीत?, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.